ETV Bharat / science-and-technology

Meta Acts On Facebook Insta : मेटाकडून फेसबूक, इंस्टाग्रामवरील 2.29 कोटींहून अधिक पोस्ट डिलीट

author img

By

Published : Dec 22, 2022, 5:16 PM IST

मेटाने नोव्हेंबरमध्ये फेसबूक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या 2.29 कोटींहून अधिक पोस्ट डिलीट ( Meta Delete Facebook Instagram Post ) केल्या. त्यावर काहींनी आक्षेप घेतला आहे. आत्ता त्याबाबतची माहिती समोर ( Meta Acts On Facebook Insta ) आली.

Meta Acts On Facebook Insta
फेसबूक इंस्टाग्रामवरील पोस्ट डिलीट

नवी दिल्ली : सोशल मीडिया दिग्गज मेटाने नोव्हेंबरमध्ये फेसबूक आणि इंस्टाग्रामवर भारतीय वापरकर्त्यांनी तयार केलेल्या 2.29 कोटींहून अधिक पोस्ट काढून टाकल्या ( Meta Delete Facebook Instagram Post ) आहेत. कंपनीने गुरुवारी जारी केलेल्या इंडिया मासिक अहवालात असे म्हटले आहे. अहवालात सामायिक केलेल्या डेटानुसार, कंपनीने फेसबुकवरील 1.95 कोटी फोटो आणि इंस्टाग्रामवरील 33.9 लाख फोटोंवर कारवाई (Meta Acts On Facebook Insta ) केली.

इतक्या पोस्टवर कारवाई : कंपनीने 1.49 कोटींहून अधिक स्पॅम पोस्टवर कारवाई केली, त्यानंतर 18 लाख अश्लिल पोस्ट ( Meta Delete Sexual Activity Content ) , 12 लाख "हिंसक आणि ग्राफिक पोस्ट" इत्यादींशी संबंधित फेसबूक कारवाई केली. इंस्टाग्रामवर, मेटाने आत्महत्या आणि दुखापत संबंधित 10 लाख पोस्ट, हिंसक पोस्टशी संबंधित 7.27 लाख पोस्ट, 7.12 लाख अश्लिल पोस्ट, 4.84 लाख गुंडगिरी किंवा छळ संबंधित पोस्ट, 2.25 लाख पोस्टवर कारवाई केली. मेटाला 2021 च्या आयटी नियमांतर्गत इंस्टाग्राम वापरकर्त्यांकडून 2,368 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ज्यात सर्वाधिक तक्रारी खाते हॅक झाल्याच्या 939 होत्या. त्यानंतर बनावट प्रोफाइल 891, धमकावणे किंवा छळ 136 प्रकरणे, अश्लिल पोस्ट 94 इत्यादी होत्या. कंपनीने बनावट प्रोफाइलच्या 555 तक्रारींवर, 253 खाती हॅक केल्याबद्दल, 31 गुंडगिरी किंवा छळ केल्याबद्दल, 30 तक्रारींवर अश्लिल कृत्य दर्शविणाऱ्या पोस्टवर कारवाई केली.

खाती हॅक झाल्याची तक्रार : फेसबूक वापरकर्त्यांनी मुख्यतः त्यांची खाती हॅक झाल्याची तक्रार ( Instagram Facebook Account Hack ) केली. त्यानंतर वापरकर्त्यांनी खात्यात प्रवेश गमावला. धमकावणे किंवा त्रास देणे आणि वापरकर्त्यांना अश्लिल कृत्य दर्शविणारी पोस्ट केले. अहवालानुसार, कंपनीने खात्यात प्रवेश गमावल्याबद्दल वापरकर्त्यांच्या सर्व तक्रारींचे निराकरण केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.