ETV Bharat / bharat

world social media day 2021: गोष्ट सोशल मीडियाची, जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक माहिती!

author img

By

Published : Jun 30, 2021, 2:16 PM IST

Updated : Jun 30, 2021, 6:54 PM IST

आज आपण 'सोशल मीडिया डे' साजरा करीत आहोत. दरवर्षी 30 जून रोजी 'सोशल मीडिया डे' साजरा केला जातो. 2010 पासून दरवर्षी 'सोशल मीडिया डे' साजरा केला जात आहे. या निमित्ताने सोशल मीडियाशी संबंधित मजेदार गोष्टींबद्दल जाणून घेऊया...

सोशल मीडिया
world social media day 2021

नवी दिल्ली - तरुण असो की वृद्ध, प्रत्येकजण सोशल मीडियाशी कनेक्ट आहे. सोशल मीडिया आज जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. फक्त एका क्लिकने, आता जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीशी संपर्क साधला जाऊ शकतो. हे सर्व सोशल मीडियाद्वारे शक्य झाले आहे. आज आपण 'सोशल मीडिया डे' साजरा करीत आहोत. दरवर्षी 30 जून रोजी 'सोशल मीडिया डे' साजरा केला जातो. 2010 पासून दरवर्षी 'सोशल मीडिया डे' साजरा केला जात आहे. या निमित्ताने सोशल मीडियाशी संबंधित मजेदार गोष्टींबद्दल जाणून घेऊया...

सध्या सर्वांत लोकप्रिय असलेल्या फेसबूकच्याही पूर्वी 'सिक्सडग्रीस' (Sixdegress) नावाचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आला होता. अँड्र्यू वाईनरिक यांनी 'सिक्सडग्रीस' लाँच केले होते. त्यानंतर 2001 मध्ये हे बंद करण्यात आले. सुरुवातीला फ्रेंडस्टर, मायस्पेस आणि फेसबुकचा वापर लोकांशी संवाद साधण्यासाठी केला गेला. फ्रेंडस्टर आणि लिंक्डइन 2002 मध्ये लाँच केले गेले होते. तर मायस्पेस 2003 मध्ये लाँच झाले होते. भारतीय वंशाच्या रामू यमलंची यांनी 2003 मध्ये ‘हाय फाइव्ह’ या सोशल मीडिया व्यासपीठाची सुरुवात केली. या पाठोपाठ ‘गुगल’ने ‘ऑर्कुट’ नावाचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 2004 ला लाँच केला होता. त्यानंतर 2006 मध्ये मार्क झुकेरबर्गने ‘फेसबुक’ या सोशल मीडिया व्यासपीठाची सेवा जगभरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केल्यानंतर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म झाकोळली गेली.

30 जून 2010 रोजी मॅशेबलच्या वतीने जागतिक सोशल मीडिया डेची सुरूवात झाली. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहूनही आपण सोशल मीडियाद्वारे एकमेकांशी संपर्क साधू शकतो. फक्त संवादामध्ये नाहीत कर व्यवसाय आणि जाहिरात जगातही प्रचंड क्रांती झाली आहे. आता ट्विटर, इंस्टाग्राम, स्नॅपचॅटसारखे प्लॅटफॉर्मही मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत आहेत.

world social media day 2021: गोष्ट सोशल मीडियाची, जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक माहिती!

सोशल मीडिया बद्दल मजेदार तथ्य -

  • दररोज लोक सोशल मीडियावर सुमारे 3 तास घालवतात.
  • जगभरात सुमारे 3.725 अब्ज सोशल मीडिया वापरकर्ते आहेत.
  • सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज सुमारे 5 लाख नवीन युजर्स जोडले जातात.
  • प्रत्येक सेकंदाला सुमारे 6 नवीन प्रोफाइल तयार होतात.
  • फेसबुकवर सुमारे 27 कोटी बनावट खाती असली तरी. फेसबुकचे बरेच युजर्स अमेरिकेतले आहेत.
  • प्रत्येकाचे फेसबुकवर सरासरी 155 मित्र आहेत.
  • फेसबुकची सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटी ख्रिस्तियानो रोनाल्डो असून त्याचे 122.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.
  • दररोज लोक फेसबुकवर सुमारे 35 मिनिटे घालवतात.
  • जानेवारी 2021 पर्यंत भारतात 448 मिलियन सोशल मीडिया युजर्स आहेत.
  • 2020 ते 2021 दरम्यान त्यात 78 मिलियन (+ 21%) वाढ झाली आहे.
  • व्हॉट्सअ‍ॅप हे देशातील सर्वाधिक वापरले जाणारे अ‍ॅप आहे. त्यानंतर यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरचा क्रमांक लागतो.

भारतात सोशल मीडिया युजर्स -

व्हॉट्सअ‍ॅप 53 कोटी
यूट्यूब44.8 कोटी
फेसबुक41 कोटी
इंस्टाग्राम 21 कोटी
ट्विटर1.75 कोटी

सोशल मीडिया मोदी सरकारच्या रडारवर -

केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. फेसबुक, ट्विटरसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स यांना ही नियमावली बंधनकारक केली आहे. यामुळे केंद्र सरकार आणि सोशल मीडिया कंपन्या यांच्यात संघर्ष सुरू आहे.

Last Updated : Jun 30, 2021, 6:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.