महाराष्ट्र

maharashtra

Wardha Girl Married With-American Boy : प्रेमाचा वेल अमेरिकेत! वर्ध्याच्या मुलीचा अमेरिकेतील मुलाशी प्रेमविवाह

By

Published : Apr 5, 2022, 1:43 PM IST

Updated : Apr 6, 2022, 12:22 PM IST

प्रेम ना जात बघते ना सीमांच्या मर्यादांवर विश्वास ठेवते. याचे जिवंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील तरुणी आणि अमेरिकेतील तरुणाची ही अनोखी प्रेमकहाणी आहे. (Wardha Girl Married With-American Boy) नम्रता विद्याधर पाटील (मुळच्या महाराष्ट्रातील वर्धा जिल्हा)येथील आहेत. त्यांनी अमेरिकेतील एका मुलावर प्रेम केले. या प्रेमाला आता बहर आला असून ते दोघांनी सोमवार (दि. 4 एप्रिल)रोजी विवाह कायद्यांतर्गत लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरूवात केली आहे.

वर्ध्याच्या मुलीचा अमेरिकेतील मुलाशी प्रेमविवाह
वर्ध्याच्या मुलीचा अमेरिकेतील मुलाशी प्रेमविवाह

रोहतक - जर कोणी एखाद्यावर खरेच प्रेम केले असेल तर त्याला कोणत्याही देशाच्या, धर्माच्या, जातीच्या, भाषेच्या सीमा अडवू शकत नाहीत. आणि त्याचे काही महत्वही त्याला नाही. अशीच एक प्रेमकहाणी हरियाणात पाहायला मिळाली आहे. येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटर्नरी एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत नम्रता विद्याधर पाटील (मुळच्या महाराष्ट्रातील वर्धा जिल्हा)येथील आहेत. त्यांनी अमेरिकेतील एका मुलावर प्रेम केले. या प्रेमाला आता बहर आला असून ते दोघांनी सोमवार (दि. 4 एप्रिल)रोजी विवाह कायद्यांतर्गत लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरूवात केली आहे.

सुरुवातीला दोघांची मैत्री झाली - नम्रता विद्याधर पाटील या मूळच्या महाराष्ट्रातील आहेत. त्या रोहतक येथील सनसिटी हॉइट्स येथे राहत आहेत. (2018)मध्ये नम्रता अमेरिकेतील अलाबामा शहरात राहणाऱ्या एका तरुण व्यावसायिकाला भेटल्या. त्यांचे नाव हॅरिसन क्वेंटिन असे आहे. हॅरिसन आणि नम्रता यांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. दोघेही एका ट्रॅव्हल एजंटला ओळखत होते. ट्रॅव्हल एजंटची पत्नी नम्रताची मैत्रिण आहे. सुरुवातीला दोघांची मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

अमेरिकेत लग्न करायचे असे ठरले होते - डिसेंबर (2018)मध्ये हॅरिसनने नम्रताला लग्नासाठी प्रपोज केले. नम्रताने याबद्दल तिच्या घरच्यांशी बोलने केले. तब्बल ३ महिन्यांनी नम्रताच्या घरच्यांनी लग्नाला होकार दिला. (2019)मध्ये हॅरिसन पुन्हा भारतात आले. दरम्यान, अमेरिकेत लग्न करायचे असे ठरले होते. कारण हॅरिसन यांच्या कुटुंबाला भारतात येण्यास शक्य नव्हते. तर, नम्रताच्या कुटुंबीयांना अमेरिकेला जाण्यास कोणतीही अडचण नव्हती.

दोघांनी पुन्हा लग्नाचा बेत आखला - (2020)च्या सुरुवातीला लग्नाचे प्लॅन बनवले गेले. दरम्यान, कोरोनाची साथ पसरली आणि दूतावासही बंद करण्यात आला. पुढच्या वर्षी म्हणजे (2021)मध्ये, कोरोना महामारीमुळे, लग्न होऊ शकले नाही. दोघांनी पुन्हा लग्नाचा बेत आखला. यादरम्यान पुन्हा एकदा व्हिसाशी संबंधित समस्या निर्माण झाल्या. अशा परिस्थितीत नम्रता आणि हॅरिसनने भारतात राहून लग्न करण्याचा निर्णय घेतला. नम्रता यांनी त्यांच्या वकिंलाशी संपर्स केला. दोघांनी या लग्नासाठी त्यांचे वकील अश्विनी फोगट यांच्यामार्फत डीसी (कम-जिल्हा विवाह अधिकारी) कॅप्टन मनोज कुमार यांच्या न्यायालयात अर्ज केला.


शेवटी नम्रता आणि हॅरिसन यांचा विवाह झाला - यासंदर्भात डीसी कोर्टाने (31 जानेवारी 2022)रोजी नोटीस जारी केली होती. या नोटिशीत एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. या लग्नात कोणाला काही अडचण असेल तर ते सांगू शकतात. लग्न मार्चमध्ये होणार होते. पण हॅरिसन काही कामानिमित्त भारतात येऊ शकले नाहीत. त्यानंतर डीसी कोर्टात लग्नाची प्रक्रिया सुरू झाली. शेवटी नम्रता आणि हॅरिसन यांचा विवाह विशेष विवाह कायद्यानुसार संपन्न झाला.

अमेरिकेत राहून व्हेटर्नरी या विषयात पीएचडी करणार - या लग्नासाठी दोन्ही बाजूंचे ३ साक्षीदारही उपस्थित होते. उपस्थितांनी नवविवाहित जोडप्याला त्यांच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या. नम्रताने सांगितले की, भावाच्या आजारपणामुळे कुटुंबीय रोहतकला येऊ शकले नाहीत. आता ती ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात चर्च वेडिंग करेल, त्यानंतर ते दोघे अमेरिकेला जाऊन वेगळे लग्न करतील. नम्रतासोबत लग्न करून हॅरिसनही खूश आहे. लग्नासाठी तिला 2 वर्षे वाट पाहावी लागली. आता नम्रता या अमेरिकेत राहून व्हेटर्नरी या विषयात पीएचडी करणार आहेत.

हेही वाचा -श्रीलंकेत पेट्रोलपेक्षा दुध महाग, एका ब्रेडची किंमत 150 रूपये; परकीय चलन घटले

Last Updated : Apr 6, 2022, 12:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details