ETV Bharat / snippets

एपीएमसी मार्केटमध्ये सर्व भाज्यांचे दर स्थिर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 21, 2024, 12:14 PM IST

एपीएमसी मार्केट
एपीएमसी मार्केट (File photo)

नवी मुंबई : नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये सर्व भाज्यांचे दर स्थिर दिसून आले. नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज १०० किलोप्रमाणे फळभाज्यांचे व १०० जुड्यांप्रमाणे पाले भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३६००रुपये ते ३८०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २२०० रुपये ते २४०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो २३०० रुपये ते २६०० रुपये असा दर आहे. फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये दर होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.