ETV Bharat / snippets

अल्पवयीन मुलाच्या दुचाकीनं उडविल्यानं तरुणाचा मृत्यू, वाहन चालवायला देणाऱ्या पित्याला अटक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 24, 2024, 7:34 AM IST

Mumbai accident Man
Mumbai accident Man (Source- ETV Bharat Desk)

मुंबई- अल्पवयीन मुलांनी चारचाकी चालविण्यानंतर कसे भयंकर अपघात होतात, हे पुण्यातील कल्याणीनगरमध्ये दिसून आले आहे. तरीही अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्याची परवानगी न देण्याबाबत पालक अजूनही जागरुक झालेले नाहीत. दक्षिण मुंबईत दुचाकीस्वार अल्पवयीन मुलानं दुचाकीवरून येणाऱ्या ३२ वर्षीय व्यक्तीला जोरदार धडक दिली. जखमी झालेल्या व्यक्तीला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर जखमांमुळे जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला. इरफान नवाब अली असे मृताचं नाव आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन मुलाची डोंगरी येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलाच्या पित्याला अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. कायद्यानुसार १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय वाहन चालविता येत नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.