ETV Bharat / snippets

वेंगुर्ला बंदराजवळ लहान होडी बुडून ४ खलाशी बेपत्ता

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 24, 2024, 12:04 PM IST

होडी बुडून ४ खलाशी बेपत्ता
होडी बुडून ४ खलाशी बेपत्ता (File image)

वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) : वेंगुर्ला बंदर येथे लहान होडी बुडून मध्यप्रदेश मधील ३ तसंच रत्नागिरी येथील १ असे एकूण ४ खलाशी बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. काल २३ मे रोजी रात्री वेंगुर्ला बंदर येथून माश्यांसाठीचा बर्फ वगैरे घेऊन एकूण ७ खलाशी मोठ्या होडीच्या दिशेनं निघाले होते. यावेळी अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने तसंच समुद्राला आलेल्या उधाणानं होडी आपला मार्ग बदलून भरकटली. यावेळी होडी वरील तिघांनी समुद्रात उड्या घेतल्या आणि खडकांचा आधार घेऊन ते बंदरावर पोचले. मात्र यानंतर होडी पलटी होऊन यातील बाकीचे ४ खलाशी बेपत्ता झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत समुद्रात शोधकार्य सुरू होतं. मात्र यातील कुणीही अजूनही सापडलेलं नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.