ETV Bharat / snippets

मुंबईत २९ फ्लेमिंगो मृतावस्थेत आढळले

author img

By PTI

Published : May 21, 2024, 12:34 PM IST

मुंबईत २९ फ्लेमिंगो मृतावस्थेत
मुंबईत २९ फ्लेमिंगो मृतावस्थेत (File photo)

मुंबई - मुंबईतील घाटकोपर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी किमान 29 फ्लेमिंगो मृतावस्थेत आढळले आहेत. वन्यजीव कल्याण गटाच्या प्रतिनिधीने मंगळवारी ही माहिती दिली. घाटकोपरमध्ये काही ठिकाणी मृत पक्ष्यांबद्दल लोकांना निरनिराळे कॉल आले होते, असं रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेलफेअर (RAWW) चे संस्थापक आणि वन विभागाचे मानद वन्यजीव वॉर्डन पवन शर्मा यांनी सांगितलं. वन विभागाच्या खारफुटी सेलसह RAWW पथकांना सोमवारी रात्री शोध मोहिमेदरम्यान या भागात २९ मृत फ्लेमिंगो आढळले, असे त्यांनी सांगितलं. मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.