"उत्तर आंध्रच्या विकासासाठी नवीन रनवे", PM मोदींच्या हस्ते भोगापुरम विमानतळाचं उद्धाटन!
भोगपुरम विमानतळ जवळपास 5 हजार कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलं आहे. या विमानतळावरुन 17 ऑगस्टपासून वाहतुकीला सुरुवात होणार आहे.

Published : August 1, 2026 at 6:06 PM IST
विजयनगरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 1 ऑगस्टला आंध्र प्रदेशमधील विजयनगरम जिल्ह्यातील भोगपूरम इथं अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केलं. या विमानतळासाठी 4 हजार 750 कोटी रुपये इतका एकूण खर्च आला आहे. तसंच पंतप्रधानांनी जवळपास 18 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रक्लपांचे शुभारंभ, उद्घाटन आणि पायाभरणी केली. तसेच आंध्र प्रदेश वेगानं प्रगती करतोय यावर पंतप्रधानांनी भाष्य केलं.
राज्याचे राज्यपाल न्यायमूर्ती अब्दुल नझीर, मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि मंत्री नारा लोकेश यांनी पंतप्रधान मोदी यांचं स्वागत केलं. केंद्रीय मंत्री राम मोहन, श्रीनिवास वर्मा आणि पेम्मासानी चंद्रशेखर यांनीही मोदींचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं.
मोदींनी टर्मिनल इमारतीचं उद्घाटन केलं. त्यानंतर मोदींनी टर्मिनलचा दौरा केला. त्यानंतर मोदींनी 15 मिनिटं आधुनिक सुविधांची पाहणी केली. जीएमआरच्या प्रतिनिधींनी या दरम्यान मोदींना चेक-इन हॉल आणि विमानतळाच्या रचनेबद्दल माहिती दिली. मोदींनी विमानतळाचा मास्टर प्लॅन आणि एव्हीएशन मॉडल पाहिलं. मोदींनी अराकू कॉफी किऑस्कलाही भेट दिली. मोदींनी या दरम्यान कॉफी घेतली.
त्यानंतर पंतप्रधान मोदी एअरपोर्ट टर्मिनलवरुन ओपन जीपमधून मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासोबत सभेत सामील होण्यासाठी निघाले. पंतप्रधानांनी टर्मिनल ते सभास्थळी जाताना आदिवासी महिलांनी सादर केलेला थिमसा नृत्य पाहिलं.
#WATCH | Vizianagaram, Andhra Pradesh | PM Narendra Modi says, "Development projects worth approximately Rs 18,000 crore have been launched, inaugurated, and had their foundation stones laid here... These development works symbolise the rapid pace at which Andhra Pradesh is… https://t.co/quDWtFjhID pic.twitter.com/egAeyUWEDz
— ANI (@ANI) August 1, 2026
मोदींकडून चंद्रबाबू नायडूंच्या दूरदृष्टीचं कौतुक : मोदींनी चंद्रबाबू नायडूंच्या दूरदृष्टीचं कौतुक केलं. मोदी म्हणाले की, "चंद्रबाबू नायडू यांनी दोन्ही बाबींचा एकत्रितपणे विचार केला हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. एकीकडं गगनाला भिडणाऱ्या विमानतळाची निर्मिती आणि दुसरीकडं आपल्या आदिवासी भगिनींनी थिमसा नृत्यात केलेला विश्वविक्रम. मला चंद्रबाबूंच्या या दूरदृष्टीचं विशेष कौतुक वाटतं."
#WATCH | Vizianagaram, Andhra Pradesh | Prime Minister Narendra Modi says, " ... it is a hallmark of chandrababu that he has embraced both aspects. on one hand, the construction of an airport, a facility that reaches for the skies, and on the other, the setting of a world record… pic.twitter.com/HC1EMgKAuG
— ANI (@ANI) August 1, 2026
"भोगपुरम विमानतळ उत्तर आंध्रचा चेहरामोहरा बदलेल" :- भोगपुरम विमानतळ हे उत्तर आंध्रची शान आहे. शमशाबाद विमानतळाने तेलंगणाचा चेहरामोहरा बदलला त्याच पद्धतीने भोगपुरम विमानतळ उत्तर आंध्रचा चेहरामोहरा आणि भविष्य बदलेल", असा विश्वास मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी व्यक्त केला.
भोगपुरम विमानतळाबाबत थोडक्यात :- भोगपुरम विमानतळाच्या निर्मितीसाठी अंदाजे 5 हजार कोटी खर्च करण्यात आले आहेत. जीएमआर विशाखापट्टणम इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीप मॉडेल अंतर्गत हे विमानतळ विकसित केलंय.
भोगपुरम विमानतळावरुन पहिलं विमान केव्हा झेपावणार? : "भोगपुरम विमानतळावरून 17 ऑगस्टपासून व्यावसायिक विमानसेवा सुरू होईल. विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता सुरुवातीला 60 लाख असेल. त्यानंतर ती 4 कोटींपर्यंत वाढवली जाईल. विमानतळाचं बांधकाम नियोजित वेळेच्या काही महिन्याआधीच झालंय", असं जीएमआर ग्रुपकडून एका निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आलं आहे.
हेही वाचा :

