छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते विविध लढाईंचं शिवनेरीवर सादरीकरण; पाहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2024, 1:28 PM IST

thumbnail

पुणे Shiv Jayanti 2024 : किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. या सोहळ्या दरम्यान जुन्नर तालुक्यातील पिंपळगांव जोगा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)  यांच्या जन्मापासून ते विविध लढाईंचं सादरीकरण केलंय. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बालशिवाजी आणि जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तसंच या चिमुरड्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर नाटकही सादर केलंय. शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. राष्ट्रगीत तसेच 'गर्जा महाराष्ट्र माझा' या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकानं यावेळी वाजवली आणि पोलीस पथकाकडून बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.