शिर्डीतील रामनवमी उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात; पाहा ग्राऊंड रिपोर्ट - Ram Navami 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 15, 2024, 9:59 PM IST

thumbnail

अहमदनगर (शिर्डी) Ram Navami Festival Preparation : शिर्डीत मंगळवारी पहाटे पासून सुरू होणाऱ्या आणि शतकोत्तरी गाठलेल्या रामनवमी उत्सवाची तयारी सुरू आहे. दिनांक 16 एप्रिल ते 18 एप्रिल असा तीन दिवसाचा रामनवमी उत्सव शिर्डीत साजरा केला जाणार आहे. श्रीरामनवमी उत्‍सवाची तयारी पूर्णत्वास येत असून मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाच्‍यावतीनं आकर्षक विद्युत रोषणाई आणि ४ नंबर प्रवेशव्‍दाराच्या आतील बाजूस श्रीराम प्रभूंचा भव्‍य काल्‍पनिक देखावा उभारण्‍यात येत आहे. श्रीरामनवमी उत्‍सवाची सुरुवात १९११ मध्‍ये श्री साईबाबांच्या अनुमतीनं करण्‍यात आली. तेव्‍हापासून प्रतिवर्षी हा उत्‍सव मोठ्या उत्‍साहाच्‍या वातावरणात शिर्डी येथे साजरा केला जातो. उत्‍सवात होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेऊन दर्शनाची व्‍यवस्‍था सुखकर व्‍हावी तसेच भाविकांचे उन्‍हापासून रक्षण व्हावे यासाठी मंदिर परिसरात, मंगल कार्यालय आणि साईनगर मैदान आदी ठिकाणी सुमारे ११ हजार ५०० चौ. फूटाचा मंडप उभारण्‍यात आलेला आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.