शिर्डीत साई परिक्रमा सोहळा; हजारो साईभक्तांच्या जयघोषानं दुमदुमली साईनगरी

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2024, 10:28 AM IST

thumbnail

शिर्डी Shirdi Sai Parikrama 2024 : गोरगरीब भक्तांचे कैवारी साई बाबा यांच्या शिर्डीत आज भल्या पहाटे शेकडो शंखांच्या साईंचा जयजयकार करत साई परिक्रमा सोहळ्यास सुरवात झाली. यावेळी खंडोबा मंदिरात विधीवत पूजा करण्यात आली. या परिक्रमा सोहळ्यास देश - विदेशातील हजारो साईभक्त पायी चौदा किलोमीटरच्या साई परिक्रमा सोहळ्यात सहभागी झाले. प्लेग महामारीच्या साथीनं मृत्यूचा तांडव सुरू केला असताना, या महामारीतून शिर्डीकरांच्या रक्षणासाठी साई बाबांनी शिर्डीच्या सीमेवर पीठ टाकत रोगाला शिर्डी गावच्या सीमेवरच रोखलं होतं, अशी अख्यायिका आहे. त्यानंतर जगभरात आलेल्या कोवीड महामारीत त्याचा उद्रेक रोखण्यासाठी शिर्डीकरांनीही सीमेवर पीठ टाकत साईंच्या स्मृती जागवल्या होत्या. त्याचवर्षी शिर्डीत 13 फेब्रुवारीला शिर्डीच्या चौदा किलोमीटर सीमेवरुन शिर्डी शहराला गोल परिक्रमा मारत साई परिक्रमा सोहळ्याला सुरुवात केली होती.  

साई परिक्रमा सोहळ्याचं यंदाच हे पाचवं वर्ष आहे. आज पहाटे संत महंतांच्या हस्ते खंडोबा मंदिरात विधीवध पूजा करत साई परिक्रमा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे मध्यप्रदेश येथील फिरत्या वाहनांवर मल्लखांबावर प्रात्यक्षिकं, वाराणशी येथील प्रसिद्ध डमरू वस्त्र, वाद्य पथक, पुणे, नागपूर आणि बीड येथील साईरथ आणि पालखी, साईंचं जीवनचरित्र चित्ररथ, लेझीम पथक, विद्यार्थ्यांचे पथनाट्य आदींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. परिक्रमा सोहळ्यासाठी आलेल्या हजारो साईभक्त आणि साईंच्या जयघोषानं साईनगरी दुमदुमुन गेली. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे ही काही काळ या परिक्रमा सोहळ्यात सहभागी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.