ETV Bharat / state

उद्धव ठाकरे परत युतीत आले तर, रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितलं काय घेणार निर्णय

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2024, 7:32 AM IST

Updated : Feb 4, 2024, 2:31 PM IST

Ramdas Athawale on Uddhav Thackeray : "उद्धव ठाकरे यांचे सगळे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले आहेत. त्यामुळं उद्धव ठाकरे एकटं तिकडं किती दिवस राहणार,' असा सवाल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला. "घराणेशाहीवर उद्धव ठाकरे यांनी बोलूच नये," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Ramdas Athawale on Uddhav Thackeray
संपादित छायाचित्र

रामदास आठवले, केंद्रीय मंत्री

शिर्डी Ramdas Athawale on Uddhav Thackeray : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी शिर्डीत भेट दिली. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरं दिली. घराणेशाहीवर उद्धव ठाकरे यांनी टीका करणं योग्य नाही. मुख्यमंत्री झाल्यावर आपल्या, मुलाला त्यांनी मंत्री केलंच होतं. निवडून येणार असेल, तर अशी तिकीटं दिली जातात, असा हल्लाबोल त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. उद्धव ठाकरे परत युतीत आले तर त्यांचं स्वागतच करू. आम्ही त्यांना सोडलं नव्हतंच, त्यांनी आम्हाला सोडलं. त्यांनी आता एकट्यानं राहून उपयोग नाही. सगळे आमदार इकडं आले आहेत. मात्र आज ना उद्या आघाडीला कंटाळून ते परत येतील, असा आम्हाला विश्वास असल्याचंही मंत्री रामदास आठवले म्हणाले.

उद्धव ठाकरे युतीत आले तर स्वागतच करू : "उद्धव ठाकरे आमच्या बरोबर आले तर त्यांचं स्वागतच आहे. ठाकरे आमच्या बरोबर होते, त्यावेळी 56 जागा निवडून आल्या. त्यातील 40 आमदार एकनाथ शिंदे बरोबर आले आहेत. त्यामुळं उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जायला नको होतं. आता उद्धव ठाकरे परत आले तर त्यांचं स्वागतच आहे. त्यांनी एकटं राहून उपयोग नाही, कारण सगळे आमदार इकडं आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कंटाळून आज नाही तर उद्या नक्कीच उद्धव ठाकरे त्यांना सोडतील, असा विश्वास आम्हाला आहे," असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

शिर्डी लोकसभेसाठी मी इच्छुक : "यापूर्वी विखे पाटील आणि पिचड यांच्याशी चर्चा झाली. मात्र आता एकनाथ शिंदेसोबत विद्यमान खासदार आल्यानं टेक्निकल अडचण आहे. शिर्डीची जागा भाजपाला मिळाल्यास मी उमेदवार असू शकतो. मात्र अंतिम निर्णय सर्वांना विचारात घेऊन केला जाईल. शिर्डीसाठी माझा आग्रह राहील," असं यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.

भाजपा आमदार गोळीबार प्रकरणी कारवाई करावी : उल्हासनगर येथील भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीच्या वादातून शिंदे गटाचे गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. आमदारानं जमिनीच्या वादातून गोळीबार करनं बरोबर नाही. पोलीस ठाण्यात ही अतिशय गंभीर घटना असून या घटनेची चौकशी होवून कायदेशीर कारवाई पोलीस करतील, असं आठवले म्हणाले.

प्रकाश आंबेडकर स्वबळावर लढतील : "वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न करायला पाहिजे. प्रकाश आंबेडकर यांचा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला पाठिंबा आहे. जो पर्यंत आंबेडकर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठींबा देणार नाहीत, तो पर्यंत त्यांना महाविकास आघाडीत घेतलं जाणार नाही. त्यामुळं प्रकाश आंबेडकर स्वबळावर लढतील, असं वातावरण दिसत आहे," असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले आहे. "मराठा समाजाचं आरक्षण हे सगळ्या मराठ्यांना नाहीये, ज्या कुटुंबाचं उत्पन्न आठ लाखा पेक्षा कमी आहे, त्यांनाच फायदा मिळणार आहे. ओबीसींचं सत्तावीस टक्के आरक्षण ही त्याच धरतीवर आहे. पन्नास लाख नोंदी कुणबी आढळल्या आहेत. मुख्यमंत्र्यानीही सगे सोयऱ्यांना त्याचा लाभ देण्याचं मान्य केलं आहे. त्यामुळं ओबीसीमध्ये नाराजी आहे."

हेही वाचा :

  1. 'एनडीए'मध्ये प्रकाश आंबेडकर आले तर मी मंत्रिपद सोडेल - केंद्रीय मंत्री रामदास आठवले
  2. 'संविधानाला कोणी हात लावला तर मी गप्प बसणार नाही', रामदास आठवले का झाले आक्रमक ? पाहा व्हिडिओ
Last Updated : Feb 4, 2024, 2:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.