ETV Bharat / state

भाजपानं महाराष्ट्रावर लक्ष वाढवलं; जे.पी नड्डांपाठोपाठ अमित शाह विदर्भ दौऱ्यावर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 2, 2024, 8:42 PM IST

Loksabha Election 2024 : आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यामुळं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत.

State President Chandrasekhar Bawankule
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर Loksabha Election 2024 : भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक संकल्प पत्रासाठी महाराष्ट्रातून 10 लाख सूचना पाठवण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. राज्यभरातील 33 हजार 323 भाजपा कार्यकर्ते प्रत्येक घरोघरी सूचना पत्रांचा बॉक्स घेऊन पोहोचतील. त्यानंतर सर्व सूचना भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात पाठवल्या जातील, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

1 लाख युवक सहभागी होतील : 4 मार्च रोजी नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर राष्ट्रीय नमो युवा महासमेलनाचं आयोजन करण्यात आल आहे. या कार्यक्रमाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा मार्गदर्शन करणार आहेत. राज्यभरातून 18 ते 35 वयोगटातील 1 लाख युवक या परिषदेत सहभागी होणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.

अमित शाह राज्याच्या दौऱ्यावर : 5 मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अकोला, जळगाव, संभाजीनगर येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अकोल्यातील चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, अकोला, अमरावती या लोकसभा मतदारसंघातील निवडणूक व्यवस्थापन समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते जळगाव येथे युवा संमेलनात मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी शाह संभाजीनगरमध्ये अहमदनगर, शिर्डी, जालना संभाजीनगर लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करतील.

नारी शक्ती वंदन कार्यक्रम : 6 मार्च रोजी राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदार संघातील 5 हजार महिलांच्या उपस्थितीत नारी शक्ती वंदन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाला ऑनलाइन संबोधित करणार आहेत, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

लाभार्थ्यांशी थेट संपर्क : 7 ते 15 मार्चपर्यंत राज्यभर भाजपा कार्यकर्ते मागील 10 वर्षांत मोदी सरकारनं राबविलेल्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संपर्क साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नमस्कार पोहचविणार आहेत, असंही बावनकुळे यांनी सांगितलं आहे.

नागपूर लोकसभा 65 टक्के मतांनी जिंकू : काँग्रेसनं नितीन गडकरी यांचा व्हायरल केलेला व्हिडीओ खोटारडा आहे. कॉंग्रेसला कायदेशीर नोटीस पाठविली अूसून नागपूर लोकसभा भाजपा 65 टक्के मतांनी जिंकणार असल्याचा दावा बावनकुळे यांनी केलाय.

उद्धव ठाकरे मनभेद : उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद नव्हे, तर मनभेद झाले आहेत. ठाकरेंची अवस्था हम दो हमारे दो अशी होणार आहे. प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान मोदींच्या विरोधात भूमिका घेतलीय. त्यामुळं प्रकाश आंबेडकर मोदींबरोबर येतील, असं वाटत नसल्याचं बावनकुळे म्हणाले.

हे वाचलंत का :

  1. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांची पहिली यादी जाहीर; महाराष्ट्राला स्थान नाही
  2. शरद पवार यांची पुन्हा राजकीय खेळी? जागावाटपाचा निर्णय होण्यापूर्वीच 'या' उमेदवारांचा प्रचार सुरू
  3. "आपके साथ रहेंगे अब इधर-उधर नहीं जाएंगे"; नितीश कुमारांच्या विधानावर पंतप्रधानांना हसू आवरेना
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.