ETV Bharat / state

अनियंत्रित एनएमएमटी बसनं मोटारसायकलस्वारांना चिरडलं, घटना सीसीटीव्हीत कैद

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2024, 10:58 PM IST

Bus Crushes Motorcyclists: नवी मुंबईतील उरण परिसरात आज (8 फेब्रुवारी) रोजी एका अनियंत्रित बसनं दोन मोटारसायकलस्वारांना आणि टेम्पोला धडक दिली. (bus accident) यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे तर दुसरा तरुण मृत्युमुखी पडला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Uncontrolled NMMT Bus Crushes
अपघात

बस अपघाताचा प्रसंग सीसीटीव्हीत कैद

मुंबई: नवी मुंबईतील उरण परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. (accident caught on cctv) अशीच एक घटना आज (8 फेब्रुवारी) घडली. यामध्ये एनएमएमटी बस चालकाचं आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं जुईनगर भागात दोन मोटारसायकलस्वारांना आणि टेम्पोला धडक दिली. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला तर दुसरा तरुण मृत्युमुखी पडला आहे. विशेष म्हणजे, अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Uncontrolled NMMT Bus
अपघातात बसचे झालेले नुकसान

काय आहे प्रकरण ? एनएमएमटी बस चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं भरधाव वेगातील बसनं नवी मुंबई परिसरातील उरण येथील खोपटा-कोप्रोली रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या दोन मोटारसायकलस्वारांना आणि टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात पाच मोटारसायकलस्वार थोडक्यात बचावले असले तरी दोन मोटारसायकलस्वारांना बसनं फडफडत नेलं. या घटनेत निलेश शशिकांत म्हात्रे (25) यांचा मृत्यू झाला आहे तर केशव ठाकूर (35) हे गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.


अपघात झाल्यानं नागरिक संतप्त : या अपघाताची माहिती मिळताच खोपटा परिसरातील संतप्त नागरिकांनी 'रास्ता रोको' करून बस चालकावर तसेच संबंधित यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी घटनास्थळी भेट देऊन मयत कुटुंबीयांचं सांत्वन केलं. सोबतच त्यांना शासनाकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्याचं आश्वासन दिलं.

ग्रामस्थांनी केल्या 'या' मागण्या : खोपटा चिरनेर कोप्रोली या मार्गावर वारंवार अपघात होत असल्यामुळं रस्ताचं रुंदीकरण करण्यात यावं, रस्त्याच्या दोन्ही बाजूस बॅरिगेट्स बसवावेत, योग्य ठिकाणी गतिरोधक हवेत. प्रत्येक कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी वाहने व्यवस्थित पास होतात की नाही याची काळजी घ्यावी. खोपटे कोप्रोली चिरनेर मार्गावर सुरक्षा रक्षक नेमावेत. वाहने ये-जा करण्यासाठी स्वतंत्र मार्ग असावा. रस्ता चार पदरी करावा. चुकीच्या पद्धतीनं वाहन चालविणाऱ्यांवर पोलीस प्रशासनातर्फे कठोर कारवाई करण्यात यावी, अशा विविध मागण्या ग्रामस्थांनी, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था, संघटनांनी प्रशासनाकडे केली आहे.

नागरिकांनी केली 'ही' मागणी: उरण परिसरातील अपघाताची माहिती मिळताच उरण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले; मात्र संतप्त नागरिकांनी 'रास्ता रोको' करण्याचा प्रयत्न करून भरधाव वेगातील वाहनांना आवरण्याची तसेच वारंवार होणाऱ्या अपघातातील मयत आणि जखमी नागरिकांना भरपाई देण्याची मागणी केली.

हेही वाचा:

  1. शिकायची हौस अशी की आजीबाई गिरवताय 'ग म भ न' चे धडे; 16 हून अधिक आजीबाई होणार साक्षर
  2. मोठी बातमी! एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा
  3. काँग्रेसचा 'हात' सोडण्यामागचं बाबा सिद्दीकींनी सांगितलं कारण; 'या' पक्षात करणार प्रवेश
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.