ETV Bharat / state

आरोप करायचे अन् पक्षात प्रवेश द्यायचा, ही भाजपाची स्टाईल; चव्हाणांच्या भाजपा प्रवेशावर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 14, 2024, 7:40 AM IST

Supriya Sule : अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशावर खासदार सुप्रिया सुळे यांना माध्यमांनी विचारलं असता, त्या म्हणाल्या, "आता भाजपमधून 33 टक्यांची मागणी होत आहे. कारण अनेक वर्ष भाजपामध्ये सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांनी काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे," असा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय. सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर होत्या, त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे
शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे

शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे

पुणे Supriya Sule : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपामध्ये प्रवेश केला. यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय. "मला भारतीय जनता पक्षाची गंमत वाटते, कारण मागच्या आठवड्यात त्यांनी लोकसभेमध्ये सर्व देशवासीयांना एक ''व्हाईट पेपर'' दिला होता. त्यामध्ये आदर्श घोटाळा एक मोठा घोटाळा आहे, असा उल्लेख होता. हे त्यांचेच खासदार आणि मंत्री सांगत होते. त्यानंतर लगेच आता अशोक चव्हाण भाजपामध्ये दाखल झालेत. मात्र, ही आता भाजपावाल्यांची स्टाईल झाली आहे," असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

खूपच चांगला प्रस्ताव होता : "आरोप करायचे आणि त्या माणसाच्या मागे ईडी, सीबीआई लावायची आणि मग त्या व्यक्तीला भाजपामध्ये घ्यायचं. भ्रष्टाचार मुक्त भारत, काँग्रेस मुक्त भारत या ज्या घोषणा भाजपानं केल्या आहेत, त्याचं उत्तर भाजपानंच दिलं आहे. खरं पाहायला गेल तर भाजपा सर्वसामान्य मायबाप जनतेची फसवणूक करत आहे," असा आरोपही सुळे यांनी यावेळी केलाय. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एका मुलाखतीत "भाजपानं मला राष्ट्रपती पदाची ऑफर दिली होती," असं म्हटलं आहे, यावर सुप्रिया सुळे यांना विचारलं असता, त्या म्हणाल्या की, "खूपच चांगला प्रस्ताव होता."

आमच्याकडं मॅजिक आकडा आहे : भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशावर म्हटलं आहे, ''आगे आगे देखो होता है क्या'' यावर सुप्रिया सुळे यांना विचारलं असता, त्या म्हणाल्या की, "जर कोणी प्रवेश काही करत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण भाजपामध्ये जे लोक पहिल्यापासून काम करत आहेत ते आता 33 टक्केची मागणी करत आहेत. कारण आता भाजपामध्ये जे नवीन लोक येत आहेत, त्यांनाच संधी मिळत आहे. सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्यांवर आज भाजपामध्ये अन्याय होत आहे," असा टोला यावेळी सुप्रिया सुळे यांनी लगावलाय. दरम्यान, चव्हाणांच्या भाजपा प्रवेशामुळे महाविकास आघाडीला फटका बसणार का, असं विचारलं असता त्या म्हणाल्या, "असं काही होणार नाही, आमच्याकडं मॅजिक आकडा आहे."

हेही वाचा :

1 महाराष्ट्रातून स्थानिक नेत्याला राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेसवर दबाव?

2 'अन्नदाता' पुन्हा रस्त्यावर; सरकार बरोबरची चर्चा निष्फळ, नाकाबंदी करत प्रशासनानं ठोकले रस्त्यावर खिळे

3 कतारमध्ये अडकलेल्या माजी अधिकाऱ्यांना शाहरुख खाननं सोडवलं? किंग खानच्या टीमनं केला खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.