ETV Bharat / state

शिवाजी महाराजांना घडवण्यात जिजामाताचं योगदान , काही लोक चुकीचं सांगतात; शरद पवारांची योगी आदित्यनाथांवर टीका

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2024, 6:30 PM IST

Sharad Pawar: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी आज (11 फेब्रुवारी) पुण्यातील आळंदीमध्ये बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदास महाराजांनी घडवल्याचं वक्तव्य केलं. त्यावर आता माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

Sharad Pawar criticized
शरद पवारांची योगी आदित्यनाथांवर टीका

शरद पवार योगी आदित्यनाथांविषयी बोलताना

पुणे Sharad Pawar : छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यात आणि त्यांचं कर्तृत्व निर्माण करण्यात त्यांच्या आईचं जिजामातेचं खरं योगदान आहे. हे सगळ्या जगाला माहीत आहे. परंतु काही लोकं चुकीचा इतिहास सांगण्यात धन्यता मानत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची कर्तुत्वाची गाथा जर कोणी घडवली असेल तर ती फक्त त्यांच्या आईनं घडवली. त्यामुळे त्यांच्या आईच्या योगदानाला दुर्लक्ष करून इतरांना त्याचं श्रेय देण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यात जिजाऊ माताचचं योगदान आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी आज पुण्यात दिली.

योगी आदित्यनाथ यांनी काय केलं वक्तव्य: आळंदीमध्ये गीता भागवताचा कार्यक्रम राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेवगिरी यांनी आयोजित केला. त्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यात समर्थ रामदासांचं योगदान असल्याचं म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य पुढे गोविंददेवगिरी महाराज करत असल्याचं म्हटलं. त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू हे समर्थ रामदास असल्याच्या कथित दाव्यावरून पुन्हा वाद निर्माण झाला.

यापूर्वीही वक्तव्यावरून झाले आहेत वाद? मराठा सेवा संघ हे जगतगुरू तुकाराम महाराजांना शिवाजी महाराजांचे गुरू मानतात. यापूर्वी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू कोण? यावरून अनेकदा वाद झाला आहे. भगसिंह कोश्यारी यांनीदेखील राज्यपाल पदावर असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू हे रामदास स्वामी असल्याचं वक्तव्य केलं होतं. काही इतिहासकारांच्या मते स्वराज्याच्या संकल्पनेच्या आणि स्वराज्याच्या निर्मितीत समर्थ रामदास स्वामी यांचा कुठेही वाटा नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची कधीही भेट झालेली नाही. त्यामुळे समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू नव्हते.

हेही वाचा:

  1. रोहित पवारांचा संजय राऊतांना सवाल; गुन्हेगारांबरोबर देवेंद्र फडणवीसांचे फोटो बाहेर येत नाहीत?
  2. गोविंददेवगिरी महाराजांनी भारतीय संस्कृतीचा प्रसार केला -देवेंद्र फडणवीस
  3. नऊ दिवसानंतर माध्यमांसमोर आल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांचं शक्तीप्रदर्शन, 'या'वर लक्ष असल्याचं केलं वक्तव्य
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.