ETV Bharat / state

सलमान खान गोळीबार प्रकरणात पोलिसांनी दोन घेतले महत्त्वाचे निर्णय, लॉरेन्स टोळीवर होणार मोठी कारवाई - Salman Khan House Firing

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 24, 2024, 9:03 AM IST

Salman Khan House Firing
सलमान खान गोळीबार प्रकरणात मोक्का अंतर्गत कारवाई होणार, सापडलेल्या पिस्तुलांचे बॅलेस्टिक रिपोर्ट मागवणार

Salman Khan House Firing : सलमान खान गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला आरोपीनं तापी नदीत फेकून दिलेली दोन पिस्तूलं सापडली आहेत. सलमान खान गोळीबार प्रकरणात कुख्यात गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोईसह त्याचा भाऊ अनमोल बिष्णोई यांनादेखील आरोपी बनवण्यात आल्यानं मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

मुंबई Salman Khan House Firing : अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मोठं यश मिळालं आहे. आरोपीनं तापी नदीत फेकून दिलेली दोन पिस्तूलं, 4 मॅगझीन आणि 17 काडतुसं सापडली आहेत. तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती लागलेल्या पिस्तुलांचा बॅलेस्टिक अहवाल मागवणार येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी दिलीय.

मोक्का अंतर्गत कारवाई : सागर पाल आणि विकी गुप्ता या दोन आरोपींना गुजरात राज्यातील भुजमधील 'माता नो मठ' या मंदिरातून 16 एप्रिल मंगळवारी पहाटे अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांना या मंदिरातच आरोपींनी विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीनं तोडलेला डॅमेज मोबाईलदेखील सापडलेला आहे. त्याचप्रमाणे सलमान खान गोळीबार प्रकरणात कुख्यात गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई सह त्याचा भाऊ अनमोल बिष्णोई यांना देखील आरोपी बनवण्यात आल्यानं मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

बॅलेस्टिक अहवालातून समोर येईल माहिती : बॅलेस्टिक अहवालातून तापी नदीत सापडलेल्या पिस्तुलातूनच सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता का? हे स्पष्ट होईल. तसंच आरोपींनी पनवेल येथील सलमान खानच्या फार्म हाऊसची एकदा रेकी केली होती. तर सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये असलेल्या घराच्या परिसराची रेकी चार वेळा करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.



बिहारमधील चंपारण इथही तपास सुरु : येत्या गुरुवारी 25 एप्रिल रोजी आरोपी सागर पाल आणि विकी गुप्ता या दोघांची पोलीस कोठडी संपत असून दोघांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. आरोपी विरोधात भक्कम पुरावे देखील गुन्हे शाखेच्या पोलिसांना सापडले आहेत. त्यामुळं मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला पुन्हा या दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी वाढवून मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. गुन्हे शाखेचे पथक बिहार येथील पश्चिम चंपारण इथं देखील समांतर तपास करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी दिलीय.

हेही वाचा :

  1. सलमान खान गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला मोठं यश; तापी नदीत फेकून दिलेली दोन्ही पिस्तूल सापडली - Salman Khan House Firing
  2. सलमान खान वाय प्लस सिक्युरिटीमध्ये करणार 'सिकंदर'ची शूटिंग - salman khan y plus security team
  3. बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळावी म्हणून आयुष शर्मानं सलमानच्या बहिणीशी केलं होतं लग्न? यात किती तथ्य आहे? - Aayush Sharma
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.