ETV Bharat / state

सचिन तेंडुलकरच्या सुरक्षा रक्षकाची आत्महत्या; डोक्यात गोळी झाडून संपवलं जीवन - SRPF Soldier Commits Suicide

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2024, 12:43 PM IST

Updated : May 15, 2024, 2:33 PM IST

SRPF Soldier Commits Suicide : सचिन तेंडुलकर याच्या घरी सुरक्षा रक्षक असलेल्या एसआरपीएफ जवानानं डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर इथं मंगळवारी रात्री घडली. प्रकाश कापडे असं त्या आत्महत्या केलेल्या एसआरपीएफ जवानाचं नाव आहे.

SRPF Soldier Commits Suicide
प्रकाश कापडे (Reporter)

सचिन तेंडुलकरच्या सुरक्षा रक्षकाची आत्महत्या; डोक्यात गोळी झाडून संपवलं जीवन (Reporter)

जळगाव SRPF Soldier Commits Suicide : सचिन तेंडुलकर याचा सुरक्षा रक्षक असलेल्या एसआरपीएफ जवानानं सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना जामनेर इथं गणपती नगरात मंगळवारी रात्री एक वाजताच्या सुमारास घडली. प्रकाश कापडे असं आत्महत्या केलेल्या एसआरपीएफ जवानाचं नाव आहे. प्रकाश कापडे हे सचिन तेंडुलकर याच्या मुंबईतील घरी सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते.

सचिन तेंडुलकरच्या सुरक्षा रक्षकाची आत्महत्या : प्रकाश कापडे हे राज्य राखील पोलीस दलात कार्यरत होते. त्यांची नियुक्ती मुंबई इथं सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या घरी सुरक्षा रक्षक म्हणून करण्यात आली होती. मात्र प्रकाश कापडे यांनी आपल्या जामनेर इथल्या घरी मंगळवारी मध्यरात्री आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी मारुन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघड होताच मोठी खळबळ उडाली.

डोक्यात एक गोळी झाडून केली आत्महत्या : प्रकाश कापडे यांनी जामनेर इथं आल्यानंतर मंगळवारी रात्री त्यांचं कुटुंब घरात झोपलेलं होतं. तर प्रकाश कापडे हे वरच्या मजल्यावर झोपण्यास गेले होते. यावेळी त्यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून एक गोळी झाडून आत्महत्या केली. प्रकाश कापडे यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मात्र प्रकाश कापडे यांनी आत्महत्या का केली, यांची माहिती अद्याप मिळू शकली नाही. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि 2 मुलं असा परिवार आहे, अशी माहिती जळगावचे पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. 'क्रिकेटच्या देवा'नं पत्नीसाठी तळल्या भजी; स्वतः सोशल मीडियावर व्हिडिओ केला पोस्ट - Sachin Tendulkar
  2. 'बॉल बॉय' ते क्रिकेटचा देव: 51 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या सचिनचे 'हे' विक्रम मोडणं जवळपास अशक्यच! - Sachin Tendulkar Birthday
  3. Cricket Match Issue: मैदानावर सचिन, 'बीग बीं'ना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींची गर्दी; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
Last Updated : May 15, 2024, 2:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.