ETV Bharat / state

सुनेत्रा पवारांच्या विजयाबाबत रुपाली चाकणकरांना विश्वास; म्हणाल्या....

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 3, 2024, 7:51 PM IST

Rupali Chakankar : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाच्या लोकसभेच्या सर्व जागांमध्ये सुनेत्रा पवार या सर्वाधिक मतांनी निवडून येतील, असा विश्वास अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला आहे. त्या आज पुणे येथे बोलत होत्या. जाणून घ्या काय म्हणाल्या रुपाली चाकणकर

Rupali Chakankar says Sunetra Pawar
रुपाली चाकणकर

बारामती आणि शिरूर लोकसभा मतदार संघाविषयी मत मांडताना रुपाली चाकणकर

पुणे Rupali Chakankar : देशभरात लवकरच लोकसभा निवडणूक होणार असून या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष बारामती लोकसभा मतदार संघाकडे लागलं आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं निश्चितच झाल्याचं पाहायला मिळत आहे. याबाबत अजित पवार गटाच्या प्रवक्त्या आणि राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, "बारामतीची जनता भावी खासदार म्हणून सुनेत्राताई यांना मान्यता देत आहे. म्हणून आम्हाला खात्री आहे की, जितक्या जागा अजित पवारांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या लढवल्या जाणार आहे त्या जागांमध्ये सुनेत्रा पवार या सर्वाधिक मतांनी निवडून येतील."

'त्या' पेपरवर सुप्रिया सुळे पास : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील सर्किट हाऊस येथे 34 गावांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर रुपाली चाकणकर यांना विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. बारामती लोकसभाबाबत यावेळी त्यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, "गेल्या पंधरा वर्षांपासून आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात काम करत आहोत. अजित पवारांनी जी कामं गेल्या पंधरा वर्षांत केली आहे त्या पेपरवर कॉपी करून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे पास झालेल्या आहेत. बारामती एक नंबर वरच आहे ती अजितदादांच्या कामांमुळं आणि प्रशासनावरील पकड असल्यामुळं."

पाटील, शिवतारेंना टोला : पुरंदर तसेच इंदापूर येथील भाजपाचे नेते आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आम्हाला विधानसभेचं बोललं तरच आम्ही मतदान करू, असं सांगत आहेत. याबाबत रुपाली चाकणकर यांनी विचार व्यक्त केला की, "महायुतीत एकत्र काम करत असताना त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करावी. मग विधानं करावीत. त्यांचं वक्तव्य हे त्यांचं परस्पर मत असेल. महायुती म्हणून आम्ही एकत्रच काम करत आहोत. नव्यानं राजकारणात आलेल्यांची काही विधानं असतील तर ती बालिशपणाची आहेत." अशा रीतीनं त्यांनी अंकिता पाटील आणि विजय शिवतारे यांना जोरदार टोला लगावला आहे.

शिरूर लोकसभेच्या जागेविषयी काय म्हणाल्या चाकणकर? : शिरूर लोकसभा मतदार संघाबाबत रुपाली चाकणकर यांनी मत मांडलं की, "प्रत्येक जण असंच म्हणत असतो. आत्मविश्वास गेल्यावर उरलेले कार्यकर्ते राहावे म्हणून असं वक्तव्य करावं लागतं. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना अशी वक्तव्य करावी लागणार आहे. कारण त्यांच्यासोबत असलेले एक दोन कार्यकर्ते हे टिकले पाहिजे. म्हणून मीच जिंकणार, असं ते सांगत आहेत."

हेही वाचा:

  1. तिहेरी हत्याकांडानं चंद्रपूर हादरलं; नराधमानं पत्नीसह केली दोन मुलींची हत्या
  2. "देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांचे... "; मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एकदा निशाणा
  3. विकसित भारत संकल्प पत्रासाठी मुंबईतून 2 लाख सूचना गोळा करणार- आशिष शेलार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.