ETV Bharat / state

महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द; आता पती निवडणुकीच्या रिंगणात! - rashmi barve caste verification

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 28, 2024, 2:01 PM IST

Updated : Mar 28, 2024, 10:03 PM IST

Lok Sabha Elections : राज्य सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या जात पडताळणी समितीनं रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलंय. त्यामुळं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद केलाय.

rashmi barve caste verification
rashmi barve caste verification

नागपूर Lok Sabha Elections : रामटेक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी अवैध ठरवलाय. त्यामुळं महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. तर माजी मंत्री सुनील केदार यांच्यासाठी देखील हा मोठा धक्का असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, आता रश्मी बर्वे यांच्या ऐवजी त्यांचे पती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.


काँग्रेससमोर निर्माण झाला पेच : रामटेक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. कारण, महायुतीकडून राजू पारवे तर महाविकास आघाडीनं रश्मी बर्वे यांना रिंगणात उतरवलं होतं. रश्मी बर्वे यांच्याकडून राजू पारवे यांना कडवे आव्हान मिळेल, असं बोललं जात होतं. मात्र, निवडणूक उमेदवारी अर्जाच्या छाननीत रश्मी बर्वे यांचा अर्ज अवैध ठरला. मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक न्याय विभागाकडं रश्मी बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीवरून जात पडताळणी समितीला तपासणीचे आदेश देण्यात आले होते.

श्यामकुमार बर्वे निवडणुकीच्या रिंगणात : रामटेक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांचा अर्ज बाद झाल्यानं रामटेकमधून आता त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी मिळाली आहे. कारण, रश्मी बर्वे यांनी सादर केलेल्या एबी फॉर्मवर दुसऱ्या क्रमांकावर पर्यायी उमेदवार म्हणून त्यांनी त्यांच्या पतीचं नाव लिहिलं होतं. उमेदवारी अर्ज दाखल करत असताना प्रत्येक उमेदवाराला अर्जासोबत एबी फॉर्मवर पर्यायी उमेदवाराचं नावही द्यावं लागतं. तसंच जर काही अडचण आली तर त्या उमेदवाराचा विचार केला जातो. याला अनुसरुनच आता श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.



कोण आहेत रश्मी बर्वे? : रश्मी बर्वे या काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. रश्मी बर्वे या माजी मंत्री सुनील केदारांच्या निकटवर्तीय आहेत. 2020 ते 2022 या काळात रश्मी बर्वे यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष म्हणून काम केलं. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी काम केलं आहे.

हेही वाचा -

  1. प्रकाश आंबेडकर यांना हात जोडून विनंती, त्यांनी वेगळा निर्णय घेऊ नये; जितेंद्र आव्हाडांचं पत्रकार परिषदेतून आवाहन - Lok Sabha Election 2024
  2. घड्याळ चिन्हावरच नाशिक लोकसभा निवडणूक लढली जाईल - छगन भुजबळ - Lok Sabha elections
  3. महाविकास आघाडी राहिली 'वंचित', प्रकाश आंबेडकर यांनी ८ जागांवरील उमेदवारांची केली घोषणा - Prakash Ambedkar news
Last Updated :Mar 28, 2024, 10:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.