ETV Bharat / state

भाजपाच्या नीतीचा प्रत्यय आता नारायण राणेंना आलेला आहे - खासदार विनायक राऊत

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 15, 2024, 3:49 PM IST

Vinayak Raut Taunt : भाजपाने नारायण राणेंचा वापर केला. त्यांना आता भाजपाच्या नीतीचा प्रत्यय आलेला आहे. राणेंना त्यांची जागा भाजपाने दाखवून दिलेली आहे, असं मत ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मांडलं आहे. तसंच भाजपामुळे शिंदे गटाची गोची नाही, ढेकूण झालाय अशी टीका देखील राऊत यांनी केली.

Narayan Rane
भाजपाच्या नितीचा प्रत्यय

विनायक राऊत यांचे नारायण राणे आणि भाजपाच्या नीतीविषयी मत

रत्नागिरी Vinayak Raut Taunt : भाजपाच्या नीतीचा प्रत्यय आता नारायण राणेंना आलेला आहे. जोपर्यंत वापर करायचा आहे, तोपर्यंत करायचा आणि नंतर कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायचं. त्याच पद्धतीने नारायण राणेंना त्यांची जागा भाजपाने दाखवून दिलेली आहे. दुर्दैव एवढंच आहे की, अशोक चव्हाण यांच्यासारख्या काँग्रेसी नेत्याला पक्षात घेऊन राज्यसभेची उमेदवारी दिली. त्यापेक्षा एखाद्या प्रामाणिक कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती तर ते भाजपाला शोभलं असतं अशी टीका शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते. तसंच ज्या अशोक चव्हाण यांना कंटाळून नारायण राणे दूर गेले होते, आता त्यांच्याच बरोबर नारायण राणे यांना काम करावं लागणार आहे, असा टोलाही खासदार राऊत यांनी यावेळी लगावला.

भाजपा ही भ्रष्टाचाऱ्यांसाठी लॉंड्री : जे-जे भष्टाचारी आहेत, त्यांनी भाजपाच्या लॉंड्रीमध्ये जायचं आणि स्वच्छ होऊन बाहेर यायचं हा सध्या चाललेला राजकीय धंदा आहे, अशी टीका देखील खासदार विनायक राऊत यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निकालाबाबत ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष काही वेगळा निर्णय देतील अशी अपेक्षा नाही. शिवसेनेच्या बाबतीत जे झालं ते आताही होईल, अशी देखील टीका खासदार राऊत यांनी यावेळी केली.

जरांगे पाटलांच्या जीवाशी खेळण्याचं पाप : भाजपामुळे शिंदे गटाची गोची नाही, ढेकूण झालाय असा टोला खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावलाय. जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत खासदार विनायक राऊत म्हणाले की, मनोज जरांगे-पाटील यांच्या जिवाशी खेळण्याचं क्रूर पाप राज्य सरकार करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना फसवलं आणि स्वतःचा टेंभा मिरवला. सरकार बेईमानी करत आहे, अशी टीका राऊत यांनी केली. तसंच नारायण राणे जरांगेंबद्दल जे बोलले ते अयोग्य असल्याचंही ते म्हणाले.



हेही वाचा:

  1. शाहरुख खानला बनायचं आहे 'जेम्स बाँडचा व्हिलन', हॉलिवूड एन्ट्रीबद्दल बोलला किंग खान
  2. घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला पाईपने मारहाण; शिक्षिकेवर गुन्हा दाखल
  3. पहले भी साथ मे थे लेकीन अब बहार आई है..; अशोक चव्हाण यांना भेटल्यानंतर प्रफुल पटेल यांचं सूचक वक्तव्य
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.