ETV Bharat / state

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण : उदयपूरमध्ये लपलेल्या भावेश भिंडेला पोलिसांनी आणलं मुंबईत, दुपारी करणार न्यायालयात हजर - Ghatkopar Hoarding Collapse Case

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 17, 2024, 7:55 AM IST

Ghatkopar Hoarding Collapse Case : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 16 नागरिकांचा बळी घेतल्याचा आरोप असलेल्या भावेश भिंडे याला मुंबई पोलिसांनी उदयपूरमधून आज पहाटे मुंबईत आणलं. वैद्यकीय तपासणी करुन दुपारी भावेश भिंडेला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Ghatkopar Hoarding Collapse Case
भावेश भिंडेला पोलिसांनी आणलं मुंबईत (Reporter)

उदयपूरमध्ये लपलेल्या भावेश भिंडेला पोलिसांनी आणलं मुंबईत (Reporter)

मुंबई Ghatkopar Hoarding Collapse Case : घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील फरार आरोपी भावेश भिंडेला इंडिगो फ्लाईटनं आज सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास पोलिसांनी मुंबईत आणलं. भावेश भिंडे हा उदयपूरमधील एका रिसॉर्टमध्ये लपला होता. त्या रिसॉर्टमधून त्याला ताब्यात घेण्यात आलं. आज भिंडेची वैद्यकीय तपासणी करुन दुपारी विक्रोळी न्यायालयात त्याला हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Ghatkopar Hoarding Collapse Case
भावेश भिंडेला पोलिसांनी आणलं मुंबईत (Reporter)

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा बळी : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा जीव गेला असून जवळपास 60 जण जखमी झाले. या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेला इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचा मालक भावेश भिंडे याला गुरुवारी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उदयपूरमधून अटक केली. त्यानंतर त्याला आज पहाटे इंडिगो फ्लाइटनं मुंबईत आणण्यात आलं. भावेश भिंडे हा उदयपूरमधील एका रिसॉर्टमध्ये लपला होता.

उदयपूरमधील रिसॉर्टमध्ये लपला होता भावेश भिंडे : घाटकोपर होर्डिंग कोसळल्याप्रकरणी होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडे याच्यावर सोमवारी रात्री पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावेश भिंडेवर भादंवी कलम 304, 338, 337 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं भावेश भिंडे याला उदयपूरमधील रिसॉर्टमधून बेड्या ठोकल्या. भावेश भिंडे हा घटना घडली त्याचदिवशी रात्री मुलुंड येथील घरातून पळाला. लोणावळा इथं भिंडे पळाला. त्यानंतर चार दिवसांनी गुन्हे शाखेच्या कक्ष 9 च्या पथकानं त्याला अटक केली. जानेवारी 2024 मध्ये भावेश भिंडे विरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात बलात्काराचा एक गुन्हा दाखल होता. पोलिसांनी भावेश भिंडे विरोधात आरोपपत्र दाखल केलं. त्याच्याविरुद्ध बृहन्मुंबई महानगर पालिकेनं अनेक एफआयआर नोंदवले आहेत. भावेश भिंडे यानं 2009 मध्ये मुलुंडमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. यावेळी भावेश भिंडेनं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात 2009 मध्ये त्याच्यावर रेल्वे पोलिसांकडं 23 गुन्हे दाखल असल्याचं नमूद केलं आहे.

भावेश भिंडेवर बेकायदेशीर वृक्षतोडीचे गुन्हे : भावेश भिंडे याच्याविरुद्ध बेकायदेशीर वृक्षतोडीचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी भावेश भिंडे गुजू अॅड्स नावाची कंपनी चालवत होता. त्याच्यावर आणि कंपनीवर अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याला महापालिकेनं काळ्या यादीत टाकलं. तरीही त्यानं Ego Media प्रायव्हेट लिमिटेड ही नवीन कंपनी सुरू केली आणि त्याला होर्डिंगचे कंत्राट मिळू लागले.

भावेश भिंडेवर बलात्काराचा गुन्हा : मुलुंड पोलीस ठाण्यात भावेश भिंडे याच्यावर 24 जानेवारी रोजी बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुलुंडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांना याबाबत विचारलं असता, त्यांनी भिंडेवर बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याचं सांगितलं. याप्रकरणी भिंडेला मुंबई उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मुलुंड पोलिसांनी यापूर्वीच आरोपपत्र दाखल केलं आहे. भावेश भिंडेनं मुलुंडमधून अपक्ष उमेदवार म्हणून 2009 ची विधानसभा निवडणूक लढवली. त्यावेळी भिंडे 10 वी पास असून त्याची दोन कोटी रुपयाची मालमत्ता असल्याचं त्यानं जाहीर केलं. त्यावेळी विधानसभा निवडणुकीत भिंडेला 1441 मतं पडली.

हेही वाचा :

  1. घाटकोपर होर्डिंग कोसळल्याप्रकरणी गुन्हे शाखेनं भावेश भिंडेला उदयपूरमध्ये ठोकल्या बेड्या - Ghatkopar Incident
  2. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांची संख्या 16 वर पोहोचली, बड्या अधिकाऱ्याचा पत्नीसह मृतदेह कारमधून काढला बाहेर - Ghatkopar hoarding collapse News
  3. बलात्काराचा गुन्हा असलेला भावेश भिंडे महाराष्ट्रा बाहेर पळाला, मुंबई पोलिसांची सात पथके शोधण्यासाठी रवाना - Ghatkopar Hoarding Accident
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.