ETV Bharat / state

MP Vinayak Raut : दोन दिवसांत महाविकास आघाडीच्या सर्वच जागा जाहीर होतील - खासदार विनायक राऊत

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 20, 2024, 4:40 PM IST

MP Vinayak Raut : इंडिया आघाडीचं 48 जागांपैकी बहुतेक जागांवर एकमत झालेलं आहे. एक-दोन जागा चर्चेसाठी आहेत. त्यावरही तोडगा निघेल आणि आम्हाला चांगलं यश मिळेल, असं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच या दोन दिवसांत महाविकास आघाडीच्या सर्वच जागा जाहीर होतील असं देखील ते यावेळी म्हणाले. ते आज (20 मार्च) रत्नागिरीत बोलत होते.

MP Vinayak Raut
खासदार विनायक राऊत

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत बोलताना विनायक राऊत

रत्नागिरी MP Vinayak Raut : खासदार विनायक राऊत म्हणाले की, इंडिया आघाडीमध्ये (INDIA Aghadi) प्रकाश आंबेडकर यांनी यावं अशी आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे. त्यांचा सन्मान होईल अशा जागा त्यांना देण्याची तयारी दर्शवली आहे. इंडिया आघाडीमधूनच प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान होईल असं राऊत यावेळी म्हणाले.


हा तर मनसेचा धंदाच : प्रत्येक निवडणूक आली की, मनसेची सेटिंग सुरू होते. तसंच स्वतःचा आमदार, खासदार, नगरसेवक निवडून आणण्याची इच्छा मनसे प्रमुखांकडे आहे, असं कधीही वाटलं नाही. उद्धव ठाकरे यांचा द्वेष म्हणून त्यांना टक्कर देण्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाशी हातमिळवणी करायची हा त्यांचा आजपर्यंतचा धंदा आहे. पण आता लोक त्यांना ओळखून आहेत. या निवडणुकीत त्यांचं पानीपत झाल्याशिवाय राहणार नाही. मनसेच्या कार्यकर्त्यांना वाटतं की, त्यांचे जे पक्षप्रमुख करताहेत ते चुकीचं आहे, असं विनायक राऊत यावेळी म्हणाले. भाजपाचा स्वतःच्या नेतृत्वावरचा विश्वास तसंच मोदींच्या गॅरंटीवरचा विश्वास उडालेला आहे. म्हणून इकडचे तिकडचे गोळा करत आपली पोळी भाजण्याचं काम सुरू आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचा विजय 100 टक्के निश्चित झालेला आहे, असं देखील ते यावेळी म्हणाले.


तर राणेंच्या पराभवाची हॅट्रिक निश्चित : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कमीत कमी मतांनी कोण पडेल असा उमेदवार ते शोधत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मतदारसंघात आले तरी इथला त्यांचा उमेदवार पडणार आहे. उद्योग मंत्र्यांचे उद्योग काय आहेत ते मी काय सध्या पाहिलेले नाहीत. हौशे-गौशे नाचताहेत त्याचा विचार आम्हाला करायची गरज नाही. आम्हाला कोकणवासीयांचा पाठिंबा मिळाला आहे आणि भविष्यातही मिळेल. नारायण राणे उमेदवार असतील तर त्यांच्या पराभवाची हॅट्रिक निश्चित आहे, असं खासदार विनायक राऊत यांनी यावेळी सांगितलं. उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत. ज्यांना ज्यांना निवडणूक लढवायची आहे, त्या उमेदवारांनी पक्षप्रमुखांची भेट घेणं आवश्यक आहे, असं देखील खासदार राऊत उद्धव ठाकरे आणि शाहू महाराजांच्या संभाव्य भेटीबाबत म्हणाले.

हेही वाचा :

  1. Kavita Petition in Supreme Court: 'माझी अटक बेकायदेशीर'; कविता यांची ईडी अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
  2. Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगानं जारी केली अधिसूचना ; जाणून घ्या महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेच्या तारखा
  3. Barber Kills Two Children In Badaun : दोन चिमुकल्यांचा गळा चिरुन खून ; पोलिसांनी नराधमाला घातलं कंठस्नान
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.