ETV Bharat / state

MLA Nilesh Lanke : आमदार निलेश लंकेंचा 'माईंड गेम'; 'तुतारी' वाजवली पण पक्ष प्रवेश नाही, म्हणाले...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 14, 2024, 6:12 PM IST

Updated : Mar 14, 2024, 7:06 PM IST

MLA Nilesh Lanke : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पारनेरचे राष्ट्रवादी आमदार निलेश लंके यांनी 'माईंड गेम' खेळलाय. शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, लंके यांनी 'तुतारी' वाजवली पण पक्ष प्रवेश केला नाही. मी शरद पवारांची विचारधारा सोडलीच नाही, अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली.

nilesh lanke
निलेश लंके

पुणे MLA Nilesh Lanke : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी लिहिलेल्या 'मी अनुभवलेल कोविड' या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या प्रकाशन सोहळ्या आधी शरद पवार, जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यासह निलेश लंके यांच्यात जवळपास अर्ध तास बैठक पार पडली.

निलेश लंकेंच्या हातात तुतारी : गेल्या काही दिवसांपासून पारनेरचे आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात होतं. शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आणि त्यांना नगरची लोकसभा देखील जाहीर होणार असल्याची चर्चा सुरू होती. अशातच गुरुवारी शरद पवार आणि निलेश लंके यांच्या पुण्यात बैठक झाली. त्यानंतर निलेश लंके यांनी तुतारी वाजवली. पण, लंके यानी पक्ष प्रवेश केला नसल्याचं दिसून आलं.

मी साहेबांच्या विचारांसोबतच : मी साहेबांच्या विचारासोबतच होतो, असं म्हणत निलेश लंके यांनी पक्ष प्रवेश टाळला आहे. तुम्ही नेमके अजित पवारांसोबत का शरद पवारांसोबत? असं विचारलं असता, विचारांसोबत असणं आणि पक्षात असणं एकच, अशी प्रतिक्रियासुद्धा निलेश लंके यांनी दिली. अधिकृत पक्ष प्रवेश झाला नसला तरी अधिकृतपणे शरद पवारांच्या व्यासपीठावरच मी असणार असल्याचं निलेश लंके यांनी सांगितलं.

शरद पवारांची प्रतिक्रिया : "निलेश लंकेंनी पारनेरमधे एमआयडीसी आणली, दुधाचा धंदा आणला. मधल्या काळात त्यांनी वेगळी भुमिका घेतली असेल किंवा नसेल, पण ते लोकांमध्ये काम करत राहिले. मी त्यांचं स्वागत करतो. आवश्यकता असल्यास आम्ही त्यांच्या मागे उभे राहू," अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. मनसे नेते वसंत मोरेंबद्दल राजकारणाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. कोणीही भेटले म्हणून खुलासा करत बसू का, असं पवार म्हणाले. निवडणूक आयुक्त निवडीवर बोलताना "निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियुक्ती सरकारच्या इच्छेनुसार होत आहेत," असं पवार म्हणाले.

शरद पवार-वसंत मोरे भेट : दोन दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केला होता. गुरुवारी मोरे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात शरद पवार यांची भेट घेतली. मी लोकसभेसाठी इच्छुक असून, त्याबाबत मी शरद पवार यांची भेट घेत असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. Supreme Court : शरद पवारांच्या नावासह फोटोचा गैरवापर, सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार गटाला दिले 'हे' निर्देश
  2. Shambhuraj Desai : मागच्या एवढ्या जागा आम्हाला मिळाव्यात यावर आम्ही ठाम - मंत्री शंभूराज देसाई
  3. Nilam Gorhe on Election : "निवडणुकीत उमेदवार अर्ज का करणार आहेत हे विचारलं पाहिजे", निलम गोऱ्हे असं का म्हणाल्या?
Last Updated :Mar 14, 2024, 7:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.