ETV Bharat / state

मराठा समाज पुन्हा आक्रमक, जळगाव रोडवर जागोजागी केला रस्ता रोको

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2024, 5:17 PM IST

Maratha Reservation : छत्रपती संभाजीनगर शहरातील जळगाव रोडवर मराठा आंदोलकांनी आज रास्ता रोको केला. यावेळी आंदोलकांनी मोठी घोषणाबाजी केली.

Maratha Reservation
Maratha Reservation

मराठा आंदोलकांचा रास्तारोको

छत्रपती संभाजीनगर Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 24 फेब्रुवारी रोजी राज्यभर रास्ता रोको करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील जळगाव मुख्य रस्त्यावर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. जवळपास एक तास त्यांनी मुख्य महामार्ग अडवून ठेवला होता. त्यावेळी जवळपास दीड किलोमीटर इतकी इतका वाहतूक खोळंबा झाला. मात्र, यातही ॲम्बुलन्स, स्वर्गरथाला मराठा समाजानं रस्ता करुन देत सामाजिक बांधिलकी जपली. या आंदोलनात पहिल्यांदाच मुस्लिम नागरिक समाविष्ट झाले होते.

जळगाव रस्त्यावर आंदोलन : मराठा समाजाला सरकारनं दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, हा निर्णय म्हणजे समाजाची फसवणूक असल्याचा आरोप मराठा समाजाच्या वतीनं केला जातोय. त्यामुळंच शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आंदोलन करण्यात आलं. शहरात जळगाव रस्ता, मुकुंदवाडी, धुळे, सोलापूर महामार्ग यासह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. याआधी सरकारनं अशाच पद्धतीनं वेगळ आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तो निर्णय न्यायालयात टिकला नाही. मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना सर्वांच्या मनात आहे. यावेळी पुन्हा एकदा सरकारनं तसाच निर्णय दिला असून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात जाण्याची भाषा वापरली आहे. इतकच नाही तर, दिलेलं आरक्षण टिकणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळं सरकारच्या भूमिकेवर शंका येत असल्यानं, आजचा रास्ता रोको केल्याची भावना मराठा समाजानं व्यक्त केली.

अंतरवाली येथे होणार महत्त्वाची बैठक : मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी 25 फेब्रुवारी रोजी अंतरवाली सराटी येथे महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती मराठा आंदोलकांनी रास्ता सुरू असताना दिली. "सरकार प्रत्येक वेळेस फसव्या घोषणा करत आहेत, त्यामुळं समाजाची दिशाभूल होत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यापुढं आंदोलनाची दिशा ठरवतील. त्याचप्रमाणे सर्व समाज पुढं जाईल. त्यामुळंच रविवारी होणारी बैठक महत्त्वाची असून त्यात होणारी निर्णय आम्ही मान्य करुन," अशी भूमिका मराठा समाजानं यावेळी व्यक्त केली.

मुस्लिम समाज देखील झाला शामील : जळगाव रस्त्यावर मराठा समाज आंदोलन करत असताना मुस्लिम बांधवांनी देखील या रास्ता रोकोमध्ये सहभाग नोंदवला. "मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा तिढा सुटल्यावर धनगर, मुस्लिम आरक्षणाबाबत आपण योग्य भूमिका घेऊ असं जाहीर केलं. त्यामुळं त्यांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आम्ही आंदोलनात सहभागी झालो असल्याची भावना मुस्लिम समाजाच्या युवकांनी व्यक्त केली. सध्या मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीनं भूमिका घेतली आहे त्या, भूमिकेला मुस्लिम समाज कधीही पाठिंबा देईल," असं देखील यावेळी मुस्लिम समाजाच्या आंदोलकांनी स्पष्ट केलं.

'हे' वाचलंत का :

  1. डोलीतून रायगडावर पोहोचले शरद पवार; स्वतः 'तुतारी' वाजवत नव्या चिन्हाचं अनावरण
  2. मराठा आरक्षण विधेयक न्यायालयात टिकण्याची शक्यता नाही, कायदेतज्ञांच्या मते 'ही' आहेत कारणे
  3. मराठा आरक्षण : मनोज जरांगे यांनी विनाकारण प्रकरण चिघळवू नये ; शंभूराज देसाईंचं आवाहन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.