ETV Bharat / state

'नाद केला पण वाया नाय गेला'; मनोज जरांगे पाटलांची थेट अमेरिकेत हवा, 'टाइम्स स्क्वेअर'वर झळकले फोटो

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2024, 12:46 PM IST

Updated : Feb 10, 2024, 1:22 PM IST

Manoj Jarange Times Square : सहा महिन्यांपूर्वी ज्यांना 'गोदापट्टा' सोडता कोणी ओळखतही नव्हतं, आज त्यांचीच हवा सातासमुद्रापार पाहायला मिळते. आपल्या गावठी आणि थेट बोलण्यानं तसंच मराठा आंदोलनामुळं राज्यासह देशात चर्चेत आलेल्या मनोज जरांगे पाटलांची थेट जो बायडन यांच्या देशात चर्चा रंगलीय. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? हो पण हे खरंय. जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण...

Manoj Jarange with CM  Eknath Shinde appeared at Times Square in America
मुख्यमंत्री शिंदे यांचा वाढदिवस अन् जरांगे पाटलांची हवा

एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांचे 'टाइम्स स्क्वेअर'वर लागले फोटो

मुंबई Manoj Jarange Times Square : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांचा जलवा थेट अमेरिकेत पाहायला मिळालाय. येथील 'टाइम्स स्क्वेअर'वर जरांगे पाटलांचे फोटो झळकले आणि देशभरात चर्चा सुरू झाली ''हू इज जरांगे पाटील?". मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नुकताच वाढदिवस झाला. त्यांचा फोटो अमेरिकेतील 'टाइम्स स्क्वेअर'वर लागला होता. त्यामध्ये मनोज जरांगेही झळकले.

जरांगे पाटलांची चर्चा थेट अमेरिकेत : मागील काही दिवसांपासून राज्यभरातच नाही तर देशभरात मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचं हत्यार उगारणारे मनोज जरांगे पाटील यांचीच चर्चा सुरू होती. आता त्यांची झलक विदेशातही पाहायला मिळालीय. या घटनेला निमित्त आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं. शिंदे यांचा शुक्रवार (9 जानेवारी) 60 वा वाढदिवस साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचे फोटो अमेरिकेतील 'टाइम्स स्क्वेअर'वर झळकले. त्यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटीलही मुख्यमंत्र्यांसोबत पाहायला मिळाले. त्यानंतर, राज्यभरातील एकनाथ शिंदे यांच्यासह मनोज जरांगे पाटील यांचे कार्यकर्ते ''नाद केला पण वाया नाय गेला'' अशी प्रतिक्रिया देत आहेत.

अमेरिकेत मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस : गेल्या काही दिवसांपासून खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुंडांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेयर करत आहेत. हे गुंडांचं राज्य असून, गुंडांचं सरकार ते चालवत असल्याची टीका राऊत करत आहेत. त्यामुळं दोन्ही गटांमध्ये वाकयुद्ध रंगलंय. अशातच आता एकनाथ शिंदे यांचे फोटो थेट अमेरिकेत झळकल्यानं चर्चा सुरू झालीय. वाढदिवसानिमित्त आता थेट अमेरिकेतील सुप्रसिद्ध 'टाइम्स स्क्वेअर'वर चौकात मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हिडिओच्या माध्यमातून झळकल्यानं कार्यकर्त्यांमध्ये काहीसं आऩंदाचं वातावरण आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 9 जानेवारी रोजी 60 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. शिंदे यांचा वाढदिवस महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आणि देशाबाहेरही साजरा करण्यात आला. युवासेना पदाधिकारी राहुल कनाल यांनी अमेरिकेत 'टाइम्स स्क्वेअर'वर व्हिडिओ झळकावत मुख्यमंत्री शिंदे यांना वाढदिवसानिमित्त ''सरप्राइज गिफ्ट'' दिलंय.

सहकाऱ्यांचेही फोटो : अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील 'टाइम्स स्क्वेअर'मध्ये मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या व्हिडिओमधून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विजयी क्षणाचा फोटोही झळकला. तसंच, या व्हिडिओमध्ये खासदार श्रीकांत शिंदे, युवासेना पदाधिकारी राहुल कनाल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांचाही फोटो यामध्ये झळकलाय.

थेट अमेरिकेत फोटो प्रसिद्ध : मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी पोस्टर्स लावणं, सोशल मीडियावर पोस्ट लिहिणं तसंच, मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमीत्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजीत करणं असे अनेक प्रकार आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. मात्र, राहुल कनाल यांनी थेट अमेरिकेतील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ झळकावलाय. त्यामुळे या व्हिडिओची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.

'ईटीव्ही'च्या सुत्रांची माहिती : अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील 'टाइम्स स्क्वेअर'मध्ये मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी जो व्हिडिओ लावण्यात आला, त्यावरून आता तो कसा लावण्यात आला याची सर्वत्र चर्चा आहे. दरम्यान, 'ईटीव्ही भारत'च्या खात्रीशीर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्लॅटफॉर्मवर 150 डॉलर्समध्ये 15 सेकंदाचा व्हिडिओ लावला जातो. तोच व्हिडिओ परत एक तास दाखवला जातो. तसे, पैसे आकारले जातात. 150 डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयानुसार 12 हजार रुपये होतात.

या अगोदरही पाक सीमेवर लागले होते बॅनर : एकनाथ शिंदे यांचे बॅनर्स ठाण्यात आणि महाराष्ट्रात लागायचे. मात्र, अयोध्या दौऱ्यानंतर संपूर्ण देशभरात मुख्यमंत्री शिंदे यांचे बॅनल लागत असल्याचं दिसून येत आहे. देशभरातच काय तर तिकडं लंडन, ऑस्ट्रेलियामध्येही शिंदे यांचे बॅनर लागल्याचं दिसून आलं होतं. आता तर पाकिस्तानच्या सीमेवरही चाहत्यांनी त्यांचं बॅनर झळकावलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यात जसे परदेशात बॅनर्स लागतात, तसे आता एकनाथ शिंदे यांचे बॅनर्सचाही चर्चेचा विषय झालाय.

हेही वाचा :

1 मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात; आजपासून पुन्हा उपोषण सुरू

2 नाशिकमधील गुंडाबरोबरचा मुख्यमंत्र्यांचा फोटो आला समोर; संजय राऊतांनी पोस्ट करत केली 'ही' मागणी

3 सीबीआयनंतर समीर वानखेडे यांच्यावर ईडीची कारवाई, मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल

Last Updated : Feb 10, 2024, 1:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.