ETV Bharat / state

नाशिक मतदारसंघातून 'या' महाराजांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज; म्हणाले... - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 26, 2024, 9:41 PM IST

Swami Shantigiri Maharaj
स्वामी शांतिगिरी महाराज

Swami Shantigiri Maharaj : नाशिक लोकसभा मतदारसंघातून स्वामी शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचं देवेंद्र फडणवीसांशी बोलणं झालं असल्याचं म्हणणं आहे. आपण अपक्ष लढू आणि जिंकूसुद्धा असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. वाचा सविस्तर बातमी

स्वामी शांतिगिरी महाराज त्यांच्या उमेदवारी अर्जाविषयी सांगताना

नाशिक Swami Shantigiri Maharaj : येथील लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून इच्छुक असलेले स्वामी शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. भाजपाचं पक्षश्रेष्ठींशी आमचं बोलणं झालं आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची चर्चा झाली आहे, असंही स्वामी शांतिगिरी महाराज यांनी म्हटलय. गेल्या काही दिवसांपासून महायुतीत नाशिकच्या जागेवरून तिढा अद्यापही कायम असताना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत स्वामी शांतिगिरी महाराज यांनी आघाडी घेतली आहे. महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष लढणार आणि जिंकणारच असा विश्वासही स्वामी शांतिगिरी महाराज यांनी व्यक्त केला आहे.

राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी निवडणूक लढवणार : दुसरीकडे जय बाबाजी भक्त परिवाराच्यावतीने महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांना नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभक्ती आणि राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी महाराज निवडणूक लढवणार असल्याचं भक्त परिवाराचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी सांगितले. नाशिक मतदारसंघात जय बाबाजी भक्त परिवाराची संख्या दोन लाखाहून अधिक आहे. तर स्वामी कंठानंद यांच्यासाठी नाशिकच्या काही उद्योजक, वैद्यकीय क्षेत्र, शेती आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहून स्वामींच्या उमेदवारीसाठी साकडे घातले आहे.

राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी साधू महाराजांची गरज : सध्याचे राजकारण पाहता संतांच्या खांद्यावर राष्ट्र निर्मितीची जबाबदारी देणे गरजेचे झाले आहे. या विज्ञान युगातही आपली भारतीय संस्कृती किती फायदेशीर आहे आणि तिचं अनुकरण परदेशातील नागरिक कुतुहलाने करत आहे हे काही वर्षांपासून आपण बघतो. येत्या काही दिवसात 2024च्या निवडणुकीचा रणसंग्राम भरणार आहे. राजकीय नेते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. आजचे राजकारण कंटाळवाणे वाटत असताना राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी जय बाबाजी भक्त परिवाराच्या झालेल्या बैठकीत जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पिठाधिश्वर अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांना नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे, असं बाबाजी परिवाराचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. भाजपाला देशाचं संविधान बदलायचंय, पण... - सुप्रिया सुळे - Supriya Sule Exclusive IV
  2. देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान शांततेत पार - Lok Sabha Election 2024
  3. नांदेड जिल्ह्यात युवकानं मतदान केंद्रात कुऱ्हाडीनं फोडलं ईव्हीमएम मशीन - Lok Sabha Election 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.