ETV Bharat / state

प्रियकराच्या मदतीनं बायकोनंच केला नवऱ्याचा खून; नवरा बेपत्ता झाल्याची दिली पोलिसात तक्रार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 29, 2024, 10:59 PM IST

Husband Murder Case
हत्याकांड प्रकरण

Husband Murder Case: प्रेमप्रकरणात नवरा अडचण ठरत असल्यानं बायकोनं प्रियकरासोबत मिळून नवऱ्याची हत्या (Wife Killed Husband) केली. यानंतर त्याचा मृतदेह दगडानं बांधून विहिरीत फेकला. पुढे नवरा बेपत्ता झाल्याचा आव आणून बायकोनं पोलीस ठाण्यात तक्रारही केली. (Husband Murder In Love Affair) मात्र, पोलिसांनी शिताफीनं तपास करून बायकोसह तिच्या प्रियकाराला अटक केली. ठाणे जिल्ह्यातील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा घडला. यात दोन अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे. वाचा काय आहे प्रकरण

चंद्रप्रकाश लोवंशी हत्याकांडाचा कसा छडा लावला याविषयी माहिती देताना एसीपी सुनील कुराडे

ठाणे Husband Murder Case : बायकोनं नवऱ्याला संपविण्यासाठी प्रियकरासोबत चार महिन्यांपासून भयानक प्लॅन रचत ३२ वर्षीय नवऱ्याला फिरण्याच्या बहान्यानं निर्जनस्थळी नेलं. (Thane Crime) त्यानंतर प्रियकरानं त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीनं नवऱ्याचा खून केला. धक्कादायक बाब म्हणजे, खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं मृतदेहाला ८० किलोचा दगड बांधून विहिरीत फेकल्याचं पोलीस तपासात उघडकीस (Thane Husband Murder) आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.


बायकोसह प्रियकराला अटक: याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून पोलीस पथकानं बायकोसह तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या. तर दोन अल्पवयीन साथीदारांची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे. रिता चंद्रप्रकाश लोवंशी असं अटक बायकोचं नाव आहे. तर तिचा प्रियकर सुमित विश्वकर्मा असं त्याचं नाव आहे. चंद्रप्रकाश सुरेशचंद्र लोवंशी (वय ३२, रा. आकांक्षा अपार्टमेंट, दावडी गाव, डोंबिवली पूर्व) असं निर्घृण खून झालेल्या नवऱ्याचं नाव आहे.

बायकोनंच नवरा बेपत्ता झाल्याची दिली तक्रार: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २५ जानेवारी रोजी सकाळी १०.२० वाजताचे सुमारास डोंबिवली पूर्व भागातील आडीवली गाव, नेताजीनगर मधील विहिरीमध्ये पाण्यात एका इसमाचा हाताचा पंजा दिसत असल्याची माहिती मिळाली. यानंतर वपोनि अशोक होनमाने, पोनि राम चोपडे, पोनि दत्तात्रय गुंड यांनी अग्निशमन दलाच्या जवानांसह घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मयताच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर R आणि उजव्या हातावर CRL असं गोंदलेलं दिसून आलं. त्यातच मानपाडा पोलीस ठाण्यात आरोपी बायकोनं मृत नवरा २१ जानेवारी रोजी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.

ठाणे जिल्ह्यातील दावडी गावात राहणारा चंद्रप्रकाश लोवंशी हा बेपत्ता झाला होता. याप्रकरणी त्याच्या पत्नीनं बेपत्ता झाल्याची तक्रार मानपाडा पोलिसात दिली होती. या व्यक्तीची बॉडी एका विहिरीत संशयास्पद स्थितीत आढळून आली. बॉडीला वजनी दगड बांधून ती पाण्यात फेकली होती. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तपासात सुमित विश्वकर्मा आणि मृताची पत्नी रिता लोवंशी यांनीच चंद्रप्रकाशचा खून केल्याचं समोर आलं. हे सुनियोजित ह्त्याकांड असल्याचं तपासात उघड झालं. -- सुनील कुराडे, एसीपी

पुरावा नसल्यानं गुन्ह्याचा तपास अवघड: मृतक नवऱ्याच्या शरीरावर हत्याराच्या जखमा असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. त्यानंतर अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणावरून मृत नवऱ्याचा खून करून त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी दगडाला बांधून विहिरीत फेकल्याचं स्पष्ट झालं. या अनुषंगानं पोलिसांनी मानपाडा पोलीस ठाण्यात भा.दं. वि.सं.कलम ३०२, २०१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. आरोपीबाबत कोणतीही माहिती नसताना हा गुन्हा उघडकीस आणणं पोलिसांपुढे मोठं आव्हान होतं. वरिष्ठांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली वपोनि अशोक होनमाने यांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला. मयताची पत्नी रिता चंद्रप्रकाश लोवंशी हिच्याकडे तपास केला असता ती काहीतरी माहिती लपवित असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. त्यानंतर तिला विश्वासात घेऊन कौशल्यानं तपास केला असता तिनं आडीवली येथे राहणारा तिचा प्रियकर सुमित विश्वकर्मा याला सर्व माहिती असल्याचं सांगितलं.

प्रेयसी आणि प्रियकराला अटक: त्या अनुषंगानं पोलिसांनी सुमित विश्वकर्मा याचा कसोटीनं शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्यानं रिता लोवंशी हिच्या बरोबर लहानपणापासून प्रेमसंबंध असल्याची माहिती दिली. तिच्या सोबत आताही प्रेमसंबंध असल्यानं सुमितनं हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती एसीपी सुनील कुराडे यांनी दिली. दोघांचाही गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानं आरोपी सुमित राजेश विश्वकर्मा आणि रिता चंद्रप्रकाश लोवंशी यांना अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने करीत आहेत.

हेही वाचा:

  1. दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, जडेजानंतर केएल राहुलही दुखापतीमुळे बाहेर
  2. लोकशाही संपवण्याच्या दिशेनं टाकलेलं पुढचं पाऊल; राहुल नार्वेकरांच्या निवडीवरुन उद्धव ठाकरेंची टीका
  3. 'माकडाच्या हाती कोलित दिलं'; पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांच्या निवडीवर विरोधक पडले तुटून
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.