ETV Bharat / state

अयोध्येतील अभिमंत्रित धनुष्यबाण घेऊन महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर दाखल, 'जय श्रीराम'चा जयघोष - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 17, 2024, 10:18 PM IST

Rahul Shewale
राहुल शेवाळे

Rahul Shewale : आज श्रीराम नवमी राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या औचित्यावर महायुतीचे उमेदवार राहुल रमेश शेवाळे हे अयोध्येच्या श्रीराम मंदिरात अभिमंत्रित केलेल्या धनुष्यबाणासह बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर पोहोचले. यावेळी शिंदे गटाचे शिवसैनिक आणि भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी दाखल

मुंबई Rahul Shewale : आज देशभरात राम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आज अयोध्येच्या श्रीराम मंदिरात अभिमंत्रित केलेल्या धनुष्यबाणासह महायुतीचे उमेदवार राहुल रमेश शेवाळे हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर पोहोचले. प्रभू श्रीरामाचे अयोध्येत मंदिर उभारण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाल्यावर यंदाची ही पहिलीच रामनवमी आहे. म्हणून रामनवमीच्या दिवशी मी स्मृतिस्थळावर येऊन नतमस्तक झालो. अशा शब्दात राहुल शेवाळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी आमदार सदा सरवणकर, शिवसेना विभागप्रमुख अविनाश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर, विभागप्रमुख अविनाश राणे, नगरसेवक समाधान सरवणकर आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.

अभिमंत्रित धनुष्यबाण बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर : अयोध्येतील तपस्वी छावनीचे पीठाधिश्वर जगतगुरु परमहंस आचार्य यांच्या निमंत्रणावरून रामनवमीच्या पूर्वसंध्येला राहुल शेवाळे अयोध्येत दाखल झाले. मंगळवारी संध्याकाळी राहुल शेवाळे अयोध्येच्या राम मंदिरात दर्शनासाठी गेले असता तेथील संत महंतांनी मंदिरात अभिमंत्रित केलेला धनुष्यबाण त्यांना सुपूर्द करत विजयासाठी आशीर्वाद दिला. हा धनुष्यबाण घेऊन राहुल शेवाळे रामनवमीच्या दिवशी मुंबईत दाखल झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होण्यासाठी ते आले. यावेळी त्यांनी अयोध्येतील धनुष्यबाण या स्मृतिस्थळावर ठेवून बाळासाहेबांचा आशीर्वाद घेतला आणि रामनवमी साजरी केली. यानंतर राहुल शेवाळे यांनी वडाळा येथील राम मंदिरात जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले.


राम मंदिर व्हावं हे बाळासाहेबांचं स्वप्न : अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे, ही बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झाल्यानंतरची ही पहिली रामनवमी आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे स्वप्न आमच्या मनात जागृत ठेवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी आज (17 एप्रिल) रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर दाखल झालो आहे. अयोध्येच्या श्रीराम मंदिरातील संत महंतांनी अभिमंत्रित करून दिलेला धनुष्यबाण घेऊन स्मृतिस्थळावर नतमस्तक होऊन रामनवमी साजरी केली.

हेही वाचा :

  1. लोकसभा निवडणूक 2024: पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या; वाचा देशभरातील प्रमुख मतदारसंघ, उमेदवारांची महत्वपूर्ण माहिती - Lok Sabha Election 2024
  2. काय आहे नागपूर मतदार संघाचं गणित?, कोणाच्या गळ्यात पडणार विजयी माळ - Lok Sabha Election 2024
  3. लोकसभा निकालानंतर भाजपावर आकडे लावण्याची वेळ येईल, इंडिया आघाडी 300 पेक्षा जास्त जागा जिकंणार - संजय राऊत - LOK SABHA ELECTION 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.