ETV Bharat / state

माहीममध्ये बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक; ट्रस्टसह तिघांविरोधात गुन्हा दाखल - Mutual Sale Of property

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 13, 2024, 10:29 PM IST

Updated : Apr 13, 2024, 10:49 PM IST

Property Fraud Case : मुंबईतील माहीम परिसरातील मालमत्तेचा विकास करण्यासाठी एका बांधकाम व्यावसायिकाची 22 कोटी रुपयांनी फसवणूक करण्यात आली असल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून माहीम पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Property Fraud Case
फसवणूक

मुंबई Property Fraud Case : माहीम परिसरातील मालमत्तेचा विकास करण्यासाठी ठराव करत मालमत्तेमधील गाळे खाली करण्यासाठी आणि भाडेपट्टाधारक कुटुंबासोबत संमती करार करण्यासाठी २२ कोटी रुपये खर्चायला भाग पाडून जागेची परस्पर विक्री करत बांधकाम व्यवसायिकाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ६३ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 420, 409 आणि 120 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती माहीम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर शिरसाट यांनी दिली आहे. एच.आय.एम.एस. बोटवाला चॅरीटीज बोटवाला टस्ट्र, शमीन इब्राहीम बोटवाला, नस्ली जमशेद बाटलीवाला आणि जुबेन सुलेमान बोटावाला यांच्या विरोधात हा गुन्हा माहीम पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.


अशा प्रकारे झाली फसवणूक : वांद्रे पश्चिम परिसरात राहत असलेल्या ६३ वर्षीय बांधकाम व्यावसायिक जावेद मोहम्मद हुसेन यांनी माहीम पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, यातील आरोपींनी संगनमताने कट रचून चॅरीटीज ट्रस्टच्या माध्यमातून १९९७ साली त्यांच्याशी संपर्क साधला. आरोपींनी धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या मालकीच्या माहिममधील मालमत्तेतील २१ गाळे खाली करण्यासाठी आणि भाडेपट्टाधारक कुटुंबासोबत संमती करार करण्यासाठी तक्रारदार यांना एकूण २२ कोटी रूपये खर्च करायला लावले. आरोपींनी संस्थेच्या माध्यमातून या मालमत्तेचा विकास तक्रारदार यांनी करण्याचा ठराव ऑक्टोबर २०१३ मध्ये केला.


मालमत्ता अन्य कंपनीला 28 कोटींना विकली : ठराव रद्द केलेला नसतानाही ऑगस्ट २०१७ मध्ये एका बैठकीत अन्य विश्वस्तांना खोटी माहिती देऊन सह्या घेत ही मालमत्ता अन्य कंपनीला २८ कोटींना विकून आपली फसवणूक केल्याचा आरोप तक्रारदार बांधकाम व्यावसायिक यांनी केला आहे. माहीममधील मालमत्तेप्रमाणेच फोर्ट येथील खाली केलेले गाळे तक्रारदार बांधकाम व्यावसायिक यांच्या वारसांच्या नावाने भाडेतत्त्वावर हस्तांतरीत करण्याचे खोटे आश्वासन दिले गेले. यानंतर तेथील कब्जेधारकांना ३ कोटी २८ लाख रुपये मोबदला द्यायला लावला. तसेच गाळ्यांचे भाडेहक्क हस्तांतरण शुल्क म्हणून दोन कोटी ५९ लाख रुपये ही रक्कम विश्वस्त संस्थेमध्ये जमा न करता या रकमेचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा :

  1. मध्यपूर्वेत धोक्याची घंटा, इराणनं जप्त केलं इस्रायलचं जहाज; भारताकडून ॲडव्हायझरी जारी - Iran seizes Israeli ship
  2. ज्येष्ठांनी फुंकले 'एसटी'त प्राण; अमृत योजनेत ज्येष्ठांचा दरमहा 100 कोटींचा प्रवास - Amrit Yojana
  3. एका व्यक्तीच्या हातात देश देणं धोकादायक, देशात संमिश्र सरकार हवं - उद्धव ठाकरे - Lok Sabha Election 2024
Last Updated : Apr 13, 2024, 10:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.