ETV Bharat / state

लातूरात काँग्रेसला धक्का; शिवराज चाकूरकर यांच्या सून डॉक्टर अर्चना पाटील यांचा भाजपात प्रवेश - Dr Archana Patil joins BJP

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 30, 2024, 5:22 PM IST

Dr. Archana Patil joins BJP
अर्चना पाटील यांचा भाजपात प्रवेश

Dr. Archana Patil joins BJP : देशाच्या लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळं लातूरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुंबई Dr. Archana Patil joins BJP : विरोधी पक्षांमधले मातब्बर नेते आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्या पक्षात ओढण्याच्या मिशनमध्ये खंड पडणार नाही, याची काळजी भाजपाचे नेते घेताना दिसत आहेत. आता भाजपाने काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरच्या ज्येष्ठ नेत्याच्या सुनेला आपल्या पक्षाचं सभासदत्व दिलं आहे. माजी लोकसभाध्यक्ष आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अर्चना चाकूरकर यांनी भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे. त्यांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यातील भाजपाची ताकद वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

मोदींच्या विकासकामानं प्रभावित होऊन : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ. अर्चना चाकूरकर यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या 'सागर' या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर बोलताना अर्चना चाकूरकर म्हणाल्या की, ''गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात विकास कामं केली आहेत. त्यांच्या विकासकामांमुळं देशाच्या प्रगतीला वेग आला आहे. पंतप्रधानांनी महिलांसाठी नारी शक्ती वंदन विधेयकही मंजूर केलं आहे. त्यामुळं ज्या महिला राजकारणात येण्यास घाबरत होत्या, त्या आता राजकारणात उतरत आहेत. त्याचप्रमाणं मी सोनिया गांधी, सुषमा स्वराज यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना जवळून पाहिलं आहे. त्यांचं कामही मी पाहिलं आहे. त्यांचाही माझ्यावर खूप प्रभाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यानं प्रभावित होऊन मी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.''

आम्ही पाच-सहा वर्षांपासून पासून वाट पाहत होतो : अर्चना चाकूरकर यांच्या प्रवेशानंतर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले की, ''काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील देशातील राजकारणात नावाजलेलं नाव आहे. त्यांनी नेहमीच मूल्याधारित राजकारण केलं आहे. त्यांनी नेहमीच कर्तव्यदक्ष राहून खूप चांगलं काम केलं आहे. समाजासाठी त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या सून डॉ.अर्चना चाकूरकर या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, त्या सामाजिक कार्यात व्यस्त होत्या. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामानं प्रभावित होऊन अखेर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. खरंतर 2019 च्या निवडणुकीत त्या पक्षात येतील अशी आमची अपेक्षा होती. त्यांच्या येण्यानं आम्हाला खूप आनंद झाला आहे.''

काँग्रेससाठी फार मोठा झटका : लातूर जिल्ह्यात चाकूरकर कुटुंबीयांचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र आणि राज्याचे माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर यांनी यापूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला असून आता अर्चना चाकूरकर यांच्या प्रवेशामुळं मराठवाड्यात भाजपाची ताकद वाढण्यास मदत होणार असून काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

हे वाचलंत का :

  1. मी भाजपामध्ये जाणार या बातम्यांना काही आधार नाही, ठाकरेंचे हात बळकट करणार -दानवे - Lok Sabha Election 2024
  2. "दहावा सर्व्हे केल्यानंतरच ते उमेदवार जाहीर करतील", बारामतीतील सर्व्हेवरुन रोहित पवारांनी अजित पवारांना डिवचलं - Baramati Lok Sabha Constituency
  3. "शिवसेना खासदारांचे PA फोन उचलत नाहीत, नीट बोलत नाहीत"; महायुतीतील खदखद चव्हट्यावर, 'ऑल इज वेल'? - Kolhapur Lok Sabha
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.