ETV Bharat / state

कथित नक्षलवादी संबंध प्रकरणी निर्दोष सुटका झाल्यानंतर जी एन साईबाबा यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 7, 2024, 12:49 PM IST

GN Saibaba News : नक्षलवाद्यांशी कथित संबंध असल्याच्या कारणावरुन दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं त्यांची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी (5 मार्च) दिला. त्यानंतर आज (7 मार्च) तब्बल 10 वर्षांनंतर जी एन साईबाबांची कारागृहातून सुटका झाली आहे.

Former professor GN Saibaba released after 10 years in prison in maoist link case know his reaction
दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी एन साईबाबा

जी एन साईबाबा यांची पहिली प्रतिक्रिया

नागपूर GN Saibaba News नागपूर खंडपीठानं जी एन साईबाबा यांच्यासह प्रशांत राही, हेम मिश्रा, महेश तिरकी आणि विजय तिरकी यांचीही निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वाल्मिकी एस. ए. मिनेझिस यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. त्यावर साईबाबा यांनी तुरुंगातील सुटकेनंतर प्रतिक्रिया दिली.

निर्दोष सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया : कथित नक्षलवादी संबंध प्रकरणी तब्बल 10 वर्ष नागपूर सेंट्रल जेलमध्ये असलेले जी. एन. साईबाबा आज (7 मार्च) कारागृहातून बाहेर आले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, "सध्या माझी प्रकृती बरी नसल्यानं मी बोलण्याच्या परिस्थितीत नाही." त्यानंतर ते आपल्या वकील आणि कुटुंबीयांसह लगेच रवाना झाले.

नागपूर खंडपीठाचा निर्णय : दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी. ए.न साईबाबा यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयानं या प्रकरणातील अन्य आरोपींची सुद्धा निर्दोष मुक्तता केली आहे. 90 टक्के शारीरिकदृष्ट्या अपंग असलेले जी. एन. साईबाबा यांना 2014 साली गडचिरोली पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर मंगळवारी तब्बल 10 वर्षानंतर नागपूर खंडपीठानं त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

50 हजारांच्या जात मुचलक्यावर सोडण्याचे निर्देश : साईबाबा आणि इतर चार आरोपींची कथित नक्षलवादी संबंध असल्याच्या प्रकरणात न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळं हा राज्य सरकार आणि पोलीस दलाला मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. यूएपीए (UAPA) लावताना नियमानुसार कारवाई झाली नव्हती, असा ठपका न्यायालयानं ठेवला आहे. तसंच साईबाबा आणि इतर आरोपींकडून डिजिटल पुरावे गोळा करताना नियम पाळले नव्हते. तसंच वकिलांनी ठेवलेले पुरावे जी. एन. साईबाबा आणि इतर आरोपींचे नक्षलवाद्यांशी संबंध तपास यंत्रणा सिद्ध करू शकले नाहीत. या आधारावर जी. एन. साईबाबा, प्रशांत राही, हेम मिश्रा, महेश तिरकी आणि विजय तिरकी या सर्वांची तुरुंगातून सुटका करण्यात आली.

हेही वाचा -

  1. नागपूर खंडपीठाचा सरकारला झटका : कथित नक्षलवादी संबंध प्रकरणी जी एन साईबाबा निर्दोष
  2. Maoist links case: माओवाद्यांशी संबंधाचे प्रकरण.. जी एन साईबाबांच्या सुटकेविरोधात आज 'सर्वोच्च' सुनावणी.. काय आहे संपूर्ण प्रकरण?
  3. जी. एन. साईबाबांचा जामिनासाठी अर्ज; उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.