ETV Bharat / state

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून उद्धव ठाकरेंची बोचरी टीका, आता फडणवीसांनीही दिलं सणसणीत उत्तर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2024, 7:28 PM IST

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीला घेऊन शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. (Uddhav Thackeray) यावर आता फडणवीसांनी पलटवार केलाय. उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असंच ते थेट म्हणाले.

Deputy CM Devendra Fadnavis
उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंच्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांचे उत्तर

नाशिक Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना फक्त मी 'गेट वेल सून' एवढंच बोलेन असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप विरोधी पक्ष वारंवार करताहेत. (Maharashtra Crime Rate) राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का? असा प्रश्न शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी उपस्थित केल्यानंतर फडणवीसांनी त्यांना उत्तर दिलं. ते आज (10 फेब्रुवारी) नाशिक दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलत होते.



उद्धव ठाकरेंविषयी मांडलं 'हे' मत : नाशिक शहरात भाजपा आमदारांनी केलेल्या विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी तसंच महाराष्ट्र राज्य पोलीस स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर आलेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ''उद्धव ठाकरे यांची भाषा, त्यांचे शब्द पाहून माझं ठाम मत झालं आहे की, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आता मी फक्त 'गेट वेल सून' एवढंच म्हणेल.''

वाढत्या गुन्हेगारीवर काय म्हणाले फडणवीस? राज्यात गुन्हेगारीच्या ज्या घटना घडल्या आहेत, त्या गंभीर आहेत; मात्र या घटना व्यक्तिगत वैमनस्यातून घडलेल्या आहेत. त्यामुळे याचा थेट संबंध राज्याच्या कायदा, सुव्यवस्थेशी येत नाही. ज्या दोन-तीन घटना घडल्या त्यात आणि त्यांच्याशी वैयक्तिक हेवेदावे, भांडणं, व्यवहार आहेत आणि त्याही बाबतीत आम्ही कडक कारवाई करत आहोत, असं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलं.


गोपीचंद जासूस तयार झाले आहेत : अभिषेक घोसाळकर हत्येमागे सत्ताधारी महिला किंवा पुरुष प्रवक्त्याचा हात आहे. याविषयी माझ्याकडे इनपुट्स आहेत, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. यावर ''विजय वडेट्टीवारांना फारसं काही माहीत नसतं. त्यात ते काही सणसणाटी गोष्टी बोलत असतात. सर्व प्रकारे चौकशी होणार आहे; पण विनाकारण अलीकडच्या काळामध्ये गोपीचंद जासूस, जग्गा जासूस तयार झाले आहेत. त्यांनी विचारपूर्वक बोलावं,'' असं उत्तर फडणवीसांनी दिलं.


भुजबळांना योग्य सुरक्षा पुरवली: अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना सुरक्षा पुरवली आहे. मध्यंतरीच्या काळात त्यांना धमक्या आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. त्यांच्या सुरक्षेबाबत सरकार योग्य ती काळजी घेत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

हेही वाचा:

  1. "राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का?", उद्धव ठाकरे आक्रमक; राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी
  2. इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर, विराट कोहलीबाबत मोठं अपडेट
  3. कितीही धमक्या आल्या, तरी मी भूमिका बदलणार नाही; छगन भुजबळांचा हल्लाबोल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.