ETV Bharat / state

काँग्रेसचा 'हात' सोडण्यामागचं बाबा सिद्दीकींनी सांगितलं कारण; 'या' पक्षात करणार प्रवेश

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2024, 5:58 PM IST

Updated : Feb 8, 2024, 6:18 PM IST

Baba Siddiqui On Congress : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी पक्षाला रामराम करत मिलिंद देवरा पाठोपाठ दुसरा झटका दिलाय. (Baba Siddiqui) गेल्या काही वर्षांपासून पक्षांमध्ये घुसमट होत असल्यानं हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, अद्यापही आमदार झीशान सिद्दीकींबाबत त्यांनी सावध पवित्रा घेतलाय.

Baba Siddiqui On Congress
बाबा सिद्दीकी

मुंबई Baba Siddiqui On Congress : गेल्या काही वर्षांपासून कॉंग्रेस पक्षामध्ये सातत्यानं घुसमट होत होती. याबाबतचा निर्णय मी 15 दिवसांपूर्वीच घेतला होता. त्यावेळेस मी पक्ष नेतृत्वाला त्याची कल्पना दिली होती. त्यामुळं मी अचानक पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, (MLA Zeeshan Siddiqui) असं म्हणणं योग्य ठरणार नाही. 48 वर्षे मी काँग्रेससोबत काम करतो आहे. 1999, 2004 आणि 2009 सलग तीन वेळा मी आमदार म्हणून वांद्रे पश्चिम मतदार संघातून निवडून आलो. राज्यात अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री, कामगार राज्यमंत्री म्हणून मी पदभारही स्वीकारला होता, असं सिद्दीकी म्हणाले.

अनेक पदांवर काम केलं : माझी राजकारणातील सुरुवात विद्यार्थी दशेपासूनच झाली होती. 1992 आणि 1997 च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणूनसुद्धा मी काम पाहिलं होतं. तर 2000 ते 2004 या काळात मला म्हाडाच्या मुंबई बोर्डाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी पक्षामार्फत दिली गेली, असं बाबा सिद्दीकी म्हणाले.

पक्षात कोंडी करण्याचा प्रयत्न : अनेक वर्षांपासून मी काँग्रेसमध्ये होतो आणि काँग्रेस पक्षानेही मला खूप काही दिलं आहे. मला हा निर्णय घेताना अतिशय वेदना होत आहेत. मात्र, सध्या काँग्रेसमध्ये काय चाललं आहे हे सर्वजण पाहतच आहोत. म्हणूनच मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. माझी पक्षात कोंडी केली जात होती. त्यामुळं हा निर्णय घेणं मला भाग पडलं, असं स्पष्टीकरण बाबा सिद्दीकी यांनी दिलं.

काँग्रेस नेतृत्वाला वेळोवेळी कल्पना दिली : कॉंग्रेस पक्षामध्ये सुरू असलेल्या काही गोष्टींबाबत तसंच आपली होणारी कोंडी याबाबत आपण सातत्यानं काँग्रेस नेतृत्वाला कल्पना दिली होती. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आपल्या पितृस्थानी आहेत. त्यांनीही आपल्याला खूप मदत केली; पण तरीही हा निर्णय घेणं मला भाग पडत आहे. आतापर्यंत काँग्रेसमधील आपला प्रवास चांगलाच राहिला. परंतु, आता हा निर्णय आपण घेत आहोत, असं देखील बाबा सिद्दीकी बोलले.

अजित पवार गटात प्रवेश करणार : काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आता आपण येत्या 10 फेब्रुवारीला वांद्रे येथे होणाऱ्या 'सरकार आपल्या दारी' कार्यक्रमात अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं बाबा सिद्दीकी यांनी सांगितलं. बाबा सिद्दीकी विचार मंचच्या माध्यमातून आपण शेकडो कार्यकर्ते तयार केले. हे कार्यकर्ते आपल्यासोबत अजित पवार गटात प्रवेश करतील. 2022 मध्ये राज्यसभेसाठी माझ्या नावाची चर्चा झाली होती. राष्ट्रीय जनता दलाच्या माध्यमातून ही चर्चा सुरू होती; मात्र तसं काही घडलं नाही. आता आपण अजित पवार यांच्यासोबत जाणार आहोत. त्यामुळे पुढच्या काही दिवसात राजकारणात मोठी उलथापालथ झालेली आपल्याला दिसेल, असंही त्यांनी सांगितलं.

ईडीची भीती नाही : ईडीच्या भीतीच्या कारवाईनं आपण जात आहात का? असं विचारलं असता बाबा सिद्दीकी म्हणाले की, ''माझ्यावर अनेक आरोप करण्यात आले. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत बनावट कंपनी बनवून शंभर कोटी रुपये घोटाळ्याचाही आरोप करण्यात आला. मात्र, हे सर्व झालं असलं तरी ईडीच्या भीतीमुळं मी जात नाही. तर माझ्या पक्षात होत असलेल्या कोंडीमुळे मी हा निर्णय घेतला आहे. माझा मुलगा झीशान हा अजूनही काँग्रेसमध्ये आहे. परंतु, हे राजकारण आहे. कधीही काहीही होऊ शकतं असे संकेतही सिद्दीकी यांनी दिले.

हेही वाचा:

  1. 'अकेला देवेंद्र कुछ भी नही कर सकता'; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका
  2. आमदार राजन साळवींच्या कुटुंबीयांवर अटकेची टांगती तलवार कायम, सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब
  3. प्राणी प्रेमींसाठी खुशखबर; मुंबईत उद्योगपती रतन टाटांनी प्राण्यांसाठी बांधलं रुग्णालय
Last Updated :Feb 8, 2024, 6:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.