ETV Bharat / state

मीरा रोडवर बुलडोझर चालला! हाणामारीच्या घटनेनंतर बेकायदेशीर बांधकामावर प्रशासनाची कारवाई

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 23, 2024, 7:51 PM IST

Mira Road Bulldozer Action : मीरा-भाईंदर महानगरपालिकेनं 23 जानेवारीला मीरा रोड परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर कारवाई केली. 21 जानेवारीला दोन समुदायांमध्ये घडलेल्या हाणामारीच्या घटनेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

Mira Road Bulldozer Action
Mira Road Bulldozer Action

मुंबई Mira Road Bulldozer Action : रविवारी (21 जानेवारी) रात्री, मुंबईतील मीरा रोड येथे एका रॅलीदरम्यान दोन समाजांमध्ये हाणामारीची घटना घडली होती. या घटनेचे पडसाद आता उमटू लागले आहेत. सोमवारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेत, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर या प्रकरणी 13 जणांना ताब्यात घेण्यात आलंय.

बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर चालवला : आता मंगळवारी, 23 जानेवारीला या परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यात आली. या ठिकाणाहून एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये, हिंसाचार घडलेल्या परिसरात मीरा-भाईंदर महानगरपालिकेनं बुलडोझरनं कारवाई करण्यात आल्याचं दिसतंय. येथील बेकायदेशीर स्टॉल्स बुलडोझरनं जमीनदोस्त करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

देवेंद्र फडणवीसांचा इशारा : यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स (RAF) टीमसह पोलिसांचा मोठा ताफा परिसरात तैनात करण्यात आला होता. उल्लेखनीय म्हणजे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दंगलखोरांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर पुढच्याच दिवशी ही कारवाई करण्यात आली.

काय घडलं होतं : अयोध्यातील मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीच्या अभिषेकाच्या पूर्वसंध्येला रविवारी रात्री मीरा-भाईंदर येथील नया नगरमध्ये वाहन रॅली काढण्यात आली होती. या रॅलीदरम्यान दोन समुदायांच्या सदस्यांमध्ये हाणामारी झाली. सशस्त्र जमावानं लोखंडी रॉड आणि काठ्यांनी हल्ला करत धार्मिक घोषणा दिल्या. त्यांनी दगड आणि काठ्या घेऊन रॅलीतील वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी 50 ते 60 जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, आतापर्यंत 13 जणांना ताब्यात घेतलंय.

हे वाचलंत का :

  1. मीरा-भाईंदरमधील राड्याची देवेंद्र फडणवीसांकडून दखल, 13 जणांना अटक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.