ETV Bharat / state

सिंधुदुर्ग-रत्नागिरीचा उमेदवार हा मोदींचा समर्थक असेल - आशिष शेलार - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 13, 2024, 8:17 PM IST

Ashish Shelar : रत्नागिरी-सिंधुदुर्गचा खासदार हा महायुतीचाच असेल, चिन्ह महायुतीचं असेल अशी माहिती भाजपा नेते अ‍ॅड. आशिष शेलार यांनी दिलीय. तर खासदार विनायक राऊत हे विकास करण्यात सपशेल अपयशी ठरले असून त्यांचा पराभव निश्चित आहे, असा दावा त्यांनी केला.

Ashish Shelar
आशिष शेलार

आशिष शेलार लोकसभा निवडणुकीविषयी बोलताना

सिंधुदुर्ग Ashish Shelar : रत्नागिरी-सिंधुदुर्गचा खासदार हा मोदींना पाठिंबा देणारा असेल. विनायक राऊतांनी केवळ भाजपावर टीका करून फक्त बातम्या छापून आणल्या, अशी खोचक टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली‌. यावेळी ते सावंतवाडी येथील महायुतीच्या कार्यालयातून बोलत होते. महायुतीचा उमेदवार हा नरेंद्र मोदी यांचा समर्थक असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच उमेदवार आहेत असं समजून आम्ही कामाला लागलो आहेत. चार दिवसात महायुतीचा उमेदवार जाहीर होईल. हा मतदारसंघ भाजपाला मिळावा आणि नारायण राणे उमेदवार असावेत अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. राणे हे केंद्रीय मंत्री आणि मोदींच्या मंत्रिमंडळात असल्यानं त्यांची मागणी होत आहे. महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. महायुती एकत्र आहे, एकत्र राहील. मोदींना पाठिंबा देणारा खासदार इथून विजयी होईल असा विश्वास व्यक्त करत विनायक राऊत यांचा पराभव निश्चित आहे, असा दावा अ‍ॅड. शेलार यांनी केला.

उद्धव ठाकरे अहंकारी नेता : भाजपाला मोदी परिवार वाढवायचा आहे‌, तो वाढत आहे‌. या परिवारात येईल त्याला सामील करून घेतलं जाईल. दरम्यान, जो चोरी करतो त्यांच्यामागे ईडी लागते ती लागली पाहिजे. ईडी मागे लागली की, राजकीय हेतूने लागली असं सांगितलं जात‌. ईडी मोदी सरकारनं सुरू केलेली नाही असं ते म्हणाले. तर चार पक्ष लढतात त्यावेळी कोणता पक्ष निवडून येऊ शकतो? कोणता उमेदवार येऊ शकतो यावर चर्चा होते‌. आमच्यात चर्चा आहे विसंवाद नाही‌. यामागे रणनिती देखील असते‌. देशात सगळ्यात अहंकारी नेता उद्धव ठाकरे आहेत‌. त्यांचं कधी चुकत नाही ते म्हणातत तेच खरं असं त्यांचं आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवायच्या भानगडीत पडू नये, असा टोला ठाकरेंना हाणला. आम्ही अहंकारात जगत नाही. अतिआत्मविश्वासात आम्ही राहत नाही असा टोला लगावला.

तर मोदी-शाह कोकणात येतील : मोदी-शाह कोकणात यावेत अशी कोकणवासीयांची इच्छा असेल तर भाजपा त्यांना नाराज करणार नाही. राजन तेली यांची भावना ही नाराजीची नाही‌. तो प्रामाणिकतेचा सूर आहे. कार्यकर्त्याला त्रास झाल्यास नेत्याला त्रास होत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. नाथ पै, मधू दंडवते, सुरेश प्रभू यांच्याप्रमाणेच विकासात्मक काम कोकणात होत आहे. मात्र, विनायक राऊत यात सपशेल अपयशी ठरलेत. रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या विकासासाठी सत्तेत असताना मतदारसंघात विकास करू शकले नाही. त्यांनी केवळ भाजपावर टीका करून बातम्या छापून आणल्या. त्यांना १०० पैकी गुण द्यायचे झाल्यास शुन्य गुण द्यावे लागलीत. त्यांचा पराभव निश्चित आहे. तर इथला उमेदवार हा महायुतीचा आणि चिन्ह देखील महायुतीचचं असेल असं अ‍ॅड. शेलार यांनी सांगितलं. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महेश सारंग, संजू परब, रवींद्र मडगावकर, अजय गोंदावळे, केतन आजगावकर, दिलीप भालेकर, संतोष गावस, विनोद सावंत, अमित परब आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

  1. 'एकनाथ शिंदे गट म्हणजे भाजपाची XXX'; संजय राऊतांची खालच्या भाषेत टीका - Sanjay Raut
  2. आदर्श ग्राम योजना कागदावर: मुख्यमंत्री पुत्रानं दत्तक घेतलेल्या गावात समस्यांचा 'डोंगर'; 'ईटीव्ही भारत'चा Exclusive रिपोर्ट - MP Shrikant Shinde
  3. कल्याणचा गड जिंकण्यासाठी ठाकरेंची मोर्चेबांधणी, विनोद घोसाळकर यांच्यावर दिली जबाबदारी - Lok Sabha Elections 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.