ETV Bharat / state

महाविकास आघाडीच्या प्रचारात स्थानिक प्रश्नांना महत्त्व देणार : बळवंत वानखडे - Balwant Wankhade Announcement

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 7, 2024, 7:49 PM IST

MVA Campaign Amravati : अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या अमरावती लोकसभा मतदारसंघात आज (7 एप्रिल) महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारासाठी शहर काँग्रेस कार्यालयातून रुक्मिणी नगर परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उबाठा या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या मिरवणुकीत सहभागी होते. स्थानिक मुद्द्यांनाच आम्ही प्रचारात अधिक महत्त्व देणार असल्याचं यावेळी बळवंत वानखडे यांनी सांगितलं.

MVA Campaign Amravati
बळवंत वानखडे

बळवंत वानखडे अमरावतीतील प्रश्नांवर बोलताना

अमरावती MVA Campaign Amravati : "आम्ही देश पातळीवरील मुद्द्यांना एकीकडं महत्त्व देत असताना स्थानिक प्रश्नांना देखील प्रचारात महत्त्व दिले जात आहे. आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या बेरोजगारीचे प्रश्न हे विषय आज देखील गंभीर आहेत. अमरावती विमानतळ अद्यापही सुरू झालेले नाही. येथील उद्योगासंदर्भातही अनेक विषय रखडलेले आहेत. मेळघाटातील प्रश्न देखील गंभीर आहे. असे सर्व विषय आमच्या प्रचारात महत्त्वाचे आहेत," असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांची उपस्थिती : महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारासाठी रुक्मिणी नगर परिसरात निघालेल्या मिरवणुकीमध्ये अमरावती जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आणि तिवशाच्या आमदार यशोमती ठाकूर, माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि माजी खासदार अनंत गुढे, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने, महानगरप्रमुख पराग गुडदे, महिला आघाडीच्या प्रीती बंड, मनीषा टेंबरे, वैभव देशमुख, माजी महापौर मिलिंद चिमोटे, विलास इंगोले, यांच्यासह तिन्ही पक्षातील तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नवनीत राणा पतींपेक्षाही श्रीमंत : अमरावती लोकसभा मतदारसंघातून खासदार नवनीत राणा यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक अर्ज दाखल केला आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या अमरावती लोकसभा मतदार संघानं संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं असताना अमरावतीत भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा या त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या पेक्षाही श्रीमंत असल्याचं त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट झालंय.

नवनीत राणांच्या संपत्तीत साडेपाच कोटी रुपयांनी वाढ : 2019 च्या निवडणुकीच्या वेळी नवनीत राणा यांची जंगम आणि स्थावर मालमत्ता मिळून त्यांच्याकडं एकूण 11 कोटी 20 लाख 54 हजार 703 रुपये इतकी संपत्ती होती. आता 2024 मध्ये त्यांच्याकडं एकूण 15 कोटी 89 लाख 77 हजार 491 असल्याचं त्यांनी उमेदवारी अर्जाबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय. यावरुन पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत साडेपाच कोटी रुपयांची वाढ झाल्याचं स्पष्ट होते.

हेही वाचा:

  1. दुचाकीवरुन जाताना किर्तनकार महाराजांवर बिबट्याचा हल्ला, महाराजांसह बिबट्याही जखमी - Bhagwat Prakash Tikhandke
  2. जागावाटपावरून शिवसेनेत कुरबुर; पाच जागांवर एक-दोन दिवसात तोडगा निघेल-संजय शिरसाट - Shivsena Meeting
  3. एकनाथ खडसे करणार भाजपा प्रवेश; चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली 'ही' प्रतिक्रिया - Lok Sabha Election 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.