ETV Bharat / state

बाबा सिद्दीकी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2024, 10:25 PM IST

सिद्दीकी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
सिद्दीकी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

Intro : मुंबई मधील काँग्रेस पक्षाचे माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या नंतर काँग्रेस पक्षाच्या आणखी एका मोठ्या नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हातात परिधान केले आहे. काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे.

मुबंई : काँग्रेस पक्षाचे माजी नेते बाबा सिद्दीकी यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रवेशापूर्वी अजित पवार यांनी वांद्रे येथील काँग्रेस आमदार झिशान सिद्धीकी यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली होती. यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. बाबा सिद्दीकी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अजित पवार यांच्याबरोबर कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री यावेळी उपस्थित होते.


यावेळी बोलताना सिद्दीकी म्हणाले की, राष्ट्रवादी सेक्युलर पक्ष आहे. आजित पवार यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. आम्हाला काँग्रेस मधून सुरवातीला खासदार आमदार आणि पुन्हा आमदार म्हणून संधी मिळाली. राजकीय जीवनात तीनवेळा काँग्रेस पक्षाच्या हात चिन्हावर लढलो आहे. राजकारणात जास्त वेळा सत्तेत राहिलो विरोधात कमी. आम्ही सेक्युलर विचार धारेचे लोक आहोत. सर्व जातींचे लोक एकत्र राहात आहेत. त्यांना प्रत्येकाला सन्मान मिळाला पाहिजे. मौलाना महामंडळाला निधी वाढवून दिला. वारेमाप आश्वासनं द्यायची असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कधी केलं नाही.


आज विरोधकांनी राज्यपालांना भेटून सरकार बरखास्त करण्याची मागणी केली. मात्र 216 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा सरकारला आहे. काही ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या, त्यांचे समर्थन मी करणार नाही. यातून कायदा सुव्यवथा बिघडल्याची भीती दाखवायचे काम केले जात आहे. बाबा सिद्धीकी सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन काम करत आहेत. सुनील दत्त साहेबांनी त्यांची हुशारी आणि कामा प्रति प्रेम पाहूनच त्यांना पक्षाचे तिकीट दिले होते. त्यानंतर नगरसेवक, आमदार आणि राज्यमंत्री असा प्रवास झाला. लोकांची कामे करणारा नेता निवडून येते असतो, हे यातून दिसतं.


विरोधात राहून विकासाची कामं होत नाहीत. फक्त विरोधाला विरोधात नको. आपल्या सोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत करतो. तसंच कुठल्याही प्रकारे आमच्याकडून अंतर देण्याचं काम होणार नाही. मान सन्मान दिला जाईल. जुन्या आणि नव्याचा समन्वय साधून न्याय देण्याचं काम केलं जाईल अशी खात्री देतो. आपण सर्व भारतीय आहोत हीच भूमिका ठेवूया अशा भावना अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केल्या आहे.

हे वाचलंत का..

  1. कितीही धमक्या आल्या, तरी मी भूमिका बदलणार नाही; छगन भुजबळांचा हल्लाबोल
  2. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून उद्धव ठाकरेंची बोचरी टीका, आता फडणवीसांनीही दिलं सणसणीत उत्तर
  3. फारुकी फर्मान बघताच राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला, म्हणाले...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.