ETV Bharat / state

फारुकी फर्मान बघताच राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला, म्हणाले...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2024, 6:52 PM IST

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज (10 फेब्रुवारी) पुण्यातील इतिहास संशोधन मंडळाला भेट दिली. (Ajit Pawar) याप्रसंगी मुगल काळातील फर्मान पाहून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावला. वाचा काय म्हणाले राज ठाकरे.

After seeing Farooqui order
राज ठाकरे

राज ठाकरेंची इतिहास संशोधन मंडळाला भेट

पुणे Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा अजित पवार यांच्यावर टीका करताना आपण अनेक वेळा पाहिलं आहे. (Raj Thackeray Pune Visit) आज ते पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी पुण्यातील इतिहास संशोधन मंडळाला भेट दिली आणि तेव्हा त्यांना इतिहास संशोधन मंडळातील जुने दस्तऐवज दाखवण्यात आले. इतिहास संशोधक मंडळाचे पांडुरंग बलकवडे यांनी राज ठाकरेंना विविध मुघल राज्याचे फर्मान दाखवले. यावेळी फारुकी फर्मान बघताच त्यांनी लगेच उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावला. ते म्हणाले की, ''अजित पवार जसं बोलतात तसं लिहिण्यात आलं आहे. स्वल्पविराम नाही, काही नाही.''

मंडळाला 25 लाख रुपयांचा निधी : राज ठाकरे यांनी आज भारत इतिहास संशोधन मंडळाला भेट दिली. यावेळी त्यांना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भेट दिलेली बाबरीची वीट इतिहास संशोधन मंडळाला भेट दिली. तसंच यावेळी त्यांनी मंडळाला 25 लाख रुपयांचा निधी देखील दिला. यावेळी भाषणात राज ठाकरे म्हणाले की, ''भारत इतिहास संशोधन मंडळात येण्याची पहिली वेळ आहे. याठिकाणी हजारो वर्षांचा इतिहास जतन केला गेला आहे. ही खूपच चांगली बाब असून बाकीकडे फक्त भूगोल आहे. इतिहास प्रत्येकानी वाचला पाहिजे. ही सगळी संस्था पाहिली आणि माझ्याकडून काही तरी करावसं वाटतं म्हणून मनसेकडून आज या संस्थेला २५ लाख रुपये देत आहे. ही संस्था मोठी झाली पाहिजे.''

तेव्हा टेंडर निघत नव्हते : पुढे राज ठाकरे म्हणाले की, लोकांपर्यंत इतिहास पोहोचला पाहिजे. नुसतं 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' म्हटलं म्हणजे इतिहास होत नाही. आपल्या रक्तात अजून महापुरुष शिरायचे आहेत. आपण फक्त जातीतून महापुरुषांना पाहतो. बाबरी पाडली तेव्हा आमचे नेते बाळा नांदगावकर तिथं होते. तेथील एक वीट त्यांनी आणली. ती मला दिली आणि आज ती मी इथं देत आहे. ती वीट तुम्हीही पाहा. आधीची बांधकामं कशी होती ते जाणून घ्या. एक हातोडा मारला आणि इमारत पडली, असं नाही. तेव्हाचं मजबूत बांधकाम होतं. कारण तेव्हा टेंडर निघत नव्हते.

हेही वाचा:

  1. सीबीआयनंतर समीर वानखेडे यांच्यावर ईडीची कारवाई, मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल
  2. निखिल वागळे गाडी तोडफोड प्रकरण; राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून 'बांगड्या भरो' आंदोलन
  3. "राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का?", उद्धव ठाकरे आक्रमक; राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.