ETV Bharat / state

भाजपानं आयोजित केलेल्या शिबिरात चेंगराचेंगरी, एका वृद्ध महिलेचा मृत्यू

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 7:13 PM IST

Woman Died In a Stampede In Nagpur : नागपूर शहर भाजपा तर्फे आयोजित नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी शनिवारी (दि. 9 मार्च) शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात अचानक गोंधळ निर्माण झाल्याने चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसंच, या घटनेत 8 ते 10 महिला जखमी झाल्या आहेत.

भाजपातर्फे आयोजित नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी शिबीर आयोजित करण्यात आलं होतं
भाजपातर्फे आयोजित नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी शिबीर आयोजित करण्यात आलं होतं

भाजपातर्फे आयोजित नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी शिबीर आयोजित करण्यात आलं होतं

नागपूर Woman Died In a Stampede In Nagpur : भाजपाच्या वतीने महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणीकृत कामगार शिबीर आयोजित करण्यात आलं होत. गृहपयोगी वस्तू मिळणार असल्याने अगदी पहाटे बांधकाम मजुरांची गर्दी लोटली होती. मात्र, सकाळी 10 वाजल्यानंतर या लोकांना सुरेश भट सभागृहात प्रवेश देण्यात आला. तोपर्यंत हजारो बांधकाम मजुरांची गर्दी त्याठिकाणी जमा झाली होती. इतक्या संख्येत लोकं आल्यानंतर सर्वांना एका वेळी आतमध्ये सोडण्यात आल्यानं चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये, 61 वर्षीय मनूबाई तुळशीराम राजपूत यांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक महिला या जखमी झाल्या आहेत.

या मॅसेजनंतर उसळली गर्दी : समाजातील शेवटच्या व्यक्तीला लाभ मिळावा या उद्देशाने राज्य सरकारने अनेक योजना राबवल्या असून, त्याचा लाभ समाजातील सर्व घटकांना मिळत आहे. या प्रक्रियेत महाराष्ट्राअंतर्गत नोंदणीकृत सर्व मजूर इमारत आणि इतर बंधपत्रित कामगार कल्याणकारी मंडळाकडून स्वयंपाकगृह साहित्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. नवीन घरगुती वस्तुंचं वाटप करण्यात येणार आहे. 8 मार्च ते 11 मार्च या कालावधीत सुरेश भट सभागृहात सकाळी 10 ते 4 वाजेपर्यं नोंदणीकृत मजुरांनी शिबिरात उपस्थित राहून लाभ घ्यावा, असं आवाहन भाजप नेत्यांनी केले होतं.

तीन तास उशिरा गेट उघडल्याने झाला गोंधळ : नागपूर शहर भाजपातर्फे बांधकाम कामगार आणि घरेलू कामगारांची नोंदणी कीट वाटप शिबिर सुरेश भट सभागृह येथे राबवण्यात येत होते. या शिबिरात अनेक महिला सकाळी पाच वाजल्यापासून रांगेत उभे राहिल्या होत्या. परंतु, आज सुट्टी असल्याने महिला खूप मोठ्या प्रमाणात सुरेश भट सभागृहात आल्यामुळे प्रचंड प्रमाणात गर्दी जमलेली होती. आयोजकांनी सकाळी गेट न उघडता तब्बल तीन तासानंतर गेट उघडल्याने पाहिले आत जाण्याच्या प्रयत्नांत काही महिला एकमेकांच्या अंगावर पडल्या. त्यामुळे झालेल्या चेगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

'ठेकेदार, व्यवस्थपकावर 302 चा गुन्हा दाखल करा' : या संपूर्ण घटनेची जबाबदारी कत्राटदारांची होती. दोन दिवसांपासून हजारोच्या संख्येत महिला येत आहेत हे माहिती असताना देखील व्यवस्थापक आणि ठेकेदार यांनी भाजप पदाधिकारी यांना कळवायला हवं होतं. ठेकेदारांच्या दुर्लक्षपणामुळे ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. याला जबाबदार सुरेश भट येथील व्यवस्थापक आणि कत्राटदार यांच्यावर कलम 302 अंतर्गत मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेच्या
मनीषा पापडकर यांनी केली आहे.

हेही वाचा :

1 "आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हा भास्कर जाधव बॅग भरुन तयार होते, पण..."; आमदार योगेश कदमांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

2 अंधश्रद्धेला 'मूठमाती' ! 'या' गावात चक्क स्मशानभूमीत साजरा केला महाशिवरात्रोत्सव, तीन वर्षांपासून सुरु आहे परंपरा

3 माझ्यावर झालेल्या संस्कारामुळं... ; सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवारांच्या गळाभेटीबाबत सुळे यांची प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.