ETV Bharat / state

लोकसभा निवडणूक 2024 : तिसऱ्या टप्प्यात 258 उमेदवार आजमावणार आपलं नशीब, बारामती, सांगली चर्चेत - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 23, 2024, 12:19 PM IST

Updated : Apr 23, 2024, 1:26 PM IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातून 258 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. या टप्प्यात बारामती आणि सांगली या चर्चेतील मतदार संघांचा समावेश असणार आहे.

Lok Sabha Election 2024
संग्रहित छायाचित्र

मुंबई Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी संपली आहे. राज्यातील तिसऱ्या टप्प्यात अकरा लोकसभा मतदारसंघात निवडणूक पार पडणार असून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात 258 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत.

11 लोकसभा मतदार संघात 258 उमेदवार : राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागं घेण्याची मुदत सोमवारी संपली. तिसऱ्या टप्प्यातील 11 लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या 11 लोकसभा मतदारसंघात 317 उमेदवारी अर्ज पात्र ठरले होते. सोमवारी उमेदवारी अर्ज मागं घेण्याच्या दिवशी 59 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागं घेतला आहे. त्यामुळे आता एकंदरीत अकरा लोकसभा मतदारसंघात 258 उमेदवार रिंगणात शिल्लक आहेत.

सांगलीकडं लक्ष तर सोलापुरातून वंचितची माघार : सांगली लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीवरुन महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्त्यारोप पहायला मिळत आहेत. काँग्रेस पक्षाचे विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागं घेतलेला नाही. त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीला फायदा होऊ नये, म्हणून वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी आपली उमेदवारी मागं घेतली आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध थेट भाजपाचे राम सातपुते यांच्यात लढत होणार आहे.



राज्यातील तिस-या टप्प्यात 11 मतदारसंघात निवडणूक :

317 उमेदवारांचे अर्ज पात्र
59 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतले मागे
259 उमेदवार निवडणूक रिंगणात

रायगड - 13
बारामती - 38,
धाराशीव (उस्मानाबाद)- 31,
लातूर - 28,
सोलापूर - 21,
माढा - 32,
सांगली 20,
सातारा - 16
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 9,
कोल्हापूर -23
हातकणंगले - 27



अशा आहेत तिसऱ्या टप्यातील मुख्य लढती

रायगड - सुनील तटकरे (राष्ट्रवादी अजित पवार)
अनंत गीते (शिवसेना ठाकरे)

बारामती - सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
सुनेत्रा पवार ( राष्ट्रवादी अजित पवार)


धाराशीव - ओमराजे निंबाळकर ( शिवसेना ठाकरे)
अर्चना राणा पाटील ( राष्ट्रवादी अजित पवार)

लातूर - शिवाजीराव काळगे ( काँग्रेस)
सुधाकर शृंगारे ( भाजप)

सोलापूर - प्रणिती शिंदे( काँग्रेस)
राम सातपूते ( भाजप)

माढा - रणजितसिह नाईक-निंबाळकर ( भाजप)
धैर्यशील मोहिते-पाटील ( राष्ट्रवादी शरद पवार )

सांगली - संजयकाका पाटील ( भाजप)
चंद्रहार पाटील ( शिवसेना ठाकरे)
विशाल पाटील ( अपक्ष)

सातारा - उदयनराजे भोसले ( भाजप)
शशिकांत शिंदे ( राष्ट्रवादी शरद पवार)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग - विनायक राऊत ( शिवसेना ठाकरे)
नारायण राणे ( भाजप)

कोल्हापूर - शाहू महाराज छत्रपती ( काँग्रेस)
संजय मंडलिक ( शिवसेना शिंदे)

हातकणंगले - राजू शेट्टी ( स्वाभिमानी)
धैर्यशील माने ( शिवसेना शिंदे)
सत्यजित पाटील ( शिवसेना ठाकरे)



सांगली लोकसभा निवडणूक, काँग्रेस पक्षाच्या भूमिकेकडं लक्ष : सांगली लोकसभा मतदार संघात विशाल पाटील यांनी बंडाचे निशाण फडकावल्यानं काँग्रेस विशाल पाटील यांच्या विरोधात काय भूमिका घेते हे पाहावे लागणार आहे. विशाल पाटील यांना कोणीतरी फूस लावत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. "25 तारखेला याबाबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल," असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात सांगली लोकसभा निवडणुकीवरून महाविकास आघाडीत बिघाडी होऊ नाही, म्हूणन काँग्रेस विशाल पाटील यांना शांत करण्यात यशस्वी होते का, अन्यथा विरोधात निर्णय घेतात, हे पाहावं लागणार आहे.

हेही वाचा :

  1. राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध; यशवंतराव चव्हाणांना 'भारतरत्न' मिळण्यासाठी करणार प्रयत्न - NCP Manifesto
  2. अकोल्यात आज अमित शाह यांची सभा, काय आहे लोकसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणे? - Akola Lok Sabha election 2024
  3. सुरुवातीलाच कमी जागा मिळाल्यामुळे 16 जागा मिळवण्यात मुख्यमंत्री यशस्वी होतील का? - Shinde Group Seats Allocation
Last Updated :Apr 23, 2024, 1:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.