ETV Bharat / state

श्रीरामाला समर्पित केला जाणार 11 टन वजनाचा लाडू; राणा दाम्पत्याचा उपक्रम

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2024, 8:30 PM IST

11 Tonne Weight Laddu
अमरावती लाडू

Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत राम मंदिर लोकार्पण सोहळानिमित्त अमरावतीतील हनुमान गढी येथे प्रभू श्रीरामांना 11 टन वजनाच्या बुंदीच्या लाडवाचा नैवेद्य दाखवला जाणार आहे. याकरिता खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी पुढाकार घेतला आहे. (Amravati Ramgarhi festival) तसेच 51 हजार भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून, यामध्ये प्रसाद स्वरूपात लाडवाचं वितरण केलं जाणार आहे.

श्रीरामांसाठी लाडू बनविण्याच्या अनुभवाविषयी सांगताना आचारी

अमरावती Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत 22 जानेवारीला भव्य मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची विधिवत स्थापना केली जाणार आहे. अमरावती शहरालगत असणाऱ्या हनुमान गढी येथे 11 टन वजनाचा आणि पंधरा फूट उंच असा बुंदीचा लाडू तयार होतोय. खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्या वतीनं हा विशेष लाडू तयार केला जातोय.

असा आहे हा बुंदीचा लाडू : अमरावती शहरातील जगदीश प्रजापती या आचाऱ्याच्या नेतृत्वात एकूण 40 कारागिरांच्या वतीनं हा भला मोठा बुंदीचा लाडू तयार केला जातो आहे. 17 जानेवारी पासून हा लाडू तयार करण्याचं काम सुरू असून यासाठी 26 क्विंटल बेसन, 26 क्विंटल तूप, पाऊण क्विंटल साखर, आठ क्विंटल मेवा वापरण्यात आल्याची माहिती हा लाडू बनवणारे आचारी जगदीश प्रजापती यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली आहे.

देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित : हनुमान गढी येथे हनुमानाची एकूण 111 फूट उंच हनुमानाची मूर्ती उभारली जात आहे. त्याच ठिकाणी हा 11 टन वजनाचा लाडू तयार केला जातो आहे. प्रभू श्रीराम अयोध्येत भव्य मंदिरात विराजमान होत असताना या ठिकाणी बुंदीचा भव्य लाडू प्रसाद स्वरूपात येथे येणाऱ्या हजारो भाविकांना वितरित केला जाणार आहे. या पर्वावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्यानं उपस्थित राहणार असल्याची माहिती बडनेराचे आमदार रवी राणा यांनी दिली आहे.


दहा हजार लाडवांचे होणार वितरण : हनुमान गढी येथे आयोजित प्रभू श्रीरामाच्या स्थापना उत्सवा दरम्यान 11 टन वजनाचा लाडू सोबतच दहा हजार छोटे लाडू या भव्य लाडूच्या अवतीभवती सजवले जाणार आहेत. हे लाडू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या वतीनं प्रसाद स्वरूपात येथे येणाऱ्या भाविकांना वितरित केले जाणार आहेत.


51 हजार भाविकांसाठी महाप्रसाद : हनुमान गढी या ठिकाणी 22 जानेवारीला 11 टन बुंदीच्या लाडूचा आस्वाद घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजता या ठिकाणी हनुमान चालीसा पठण आणि हनुमानाची आरती झाल्यावर एकूण 51 हजार जणांना महाप्रसाद वितरित केला जाणार असल्याचं आमदार रवी राणा यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा:

  1. मुंबईतील डॉ.आंबेडकर रुग्णालयाला भीषण आग; रुग्णांना वाचवण्यात यश
  2. इथोपियाच्या हायली लेमीनं पटकावलं टाटा मॅरेथॉनचं विजेतेपद, वाचा विजेत्यांची यादी एका क्लिकवर
  3. राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी 'हे' सेलिब्रिटी झाले रवाना
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.