ETV Bharat / sports

घरच्या मैदानावर राजधानी 'दिल्ली' एक्सप्रेस विजयी! 220 धावा करुनही गुजरात विजयापासून 'चार पावलं' दुरच - DC vs GT

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 24, 2024, 7:46 PM IST

Updated : Apr 25, 2024, 7:20 AM IST

IPL 2024 DC vs GT
घरच्या मैदानावर राजधानी 'दिल्ली' एक्सप्रेस विजयी मार्गावर! 220 धावा करुनही गुजरात विजयापासून 'चार पावलं' दुरच

IPL 2024 DC vs GT : आयपीएल 2024 हंगामात बुधवारी गुजरात टायटन्स (GT) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यातील सामना चांगलाच रंगला. यात दिल्लीनं शेवटच्या चेंडूवर गुजरातचा चार धावांनी पराभव केला.

नवी दिल्ली IPL 2024 DC vs GT : ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स (DC) विजयी मार्गावर परतलीय. या संघानं इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामात चौथा विजय नोंदवलाय. बुधवारी झालेल्या सामन्यात दिल्लीनं गुजरात टायटन्सचा (GT) 4 धावांनी पराभव केला.

गुजरातचे प्रयत्न अपुरे : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीनं गुजरातसमोर 225 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. धावांचं लक्ष्य गाठताना गुजरातच संघानं 220 धावा करू चार धावांनी सामना गमावला. गुजरातकडून साई सुदर्शननं 39 चेंडूत 65 धावांची खेळी केली. तर डेव्हिड मिलरनं 23 चेंडूत 55 धावा केल्या. तसंच सलामीवीर वृद्धिमान साहानं 39 धावा केल्या. तर दिल्ली संघाकडून रसिक सलामनं 3 आणि कुलदीप यादवनं 2 बळी घेतले. मुकेश कुमार, अक्षर पटेल आणि एनरिक नॉर्शिया यांना प्रत्येकी 1 बळी मिळविला.

दिल्लीची आक्रमक फलंदाजी : नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सनं 4 गडी गमावून 224 धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांनी अर्धशतकी खेळी केली. पंतनं 43 चेंडूत 88 धावांची नाबाद खेळी केली. यात त्यानं 8 षटकार आणि 5 चौकार मारले. तर अक्षरनंही 43 चेंडूत 66 धावा केल्या. शेवटी ट्रिस्टन स्टब्स आला. त्यानं अवघ्या 7 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या. गुजरातसाठी वेगवान गोलंदाज संदीप वॉरियरनं जबरदस्त गोलंदाजी करत सर्वाधिक 3 बळी घेतले. तर फिरकी गोलंदाज नूर अहमदनं 1 बळी घेतला.

गुणतालिकेत गुजरातचे स्थान घसरले : ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघानं या हंगामात आतापर्यंत 9 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर 5 सामने गमावले आहेत. या विजयासह संघानं गुणतालिकेत 8व्या स्थानावरुन 6व्या स्थानावर झेप घेतलीय. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी दिल्लीला आता उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. दुसरीकडे, गुजरात संघानं आतापर्यंत 9 पैकी 4 जिंकले आहेत. तर 5 गमावले आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरातचा संघ सध्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर घसरलाय.

हेही वाचा :

  1. 'बॉल बॉय' ते क्रिकेटचा देव: 51 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या सचिनचे 'हे' विक्रम मोडणं जवळपास अशक्यच! - Sachin Tendulkar Birthday
  2. स्टॉइनिसच्या ऐतिहासिक शतकानं चेन्नईच्या 'किंग्ज'विरुद्ध लखनौ ठरली 'सुपर जायंट्स'; गायकवाडची शतकी खेळी व्यर्थ - CSK vs LSG
Last Updated :Apr 25, 2024, 7:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.