ETV Bharat / spiritual

'या' राशींच्या पुरुषांना प्रॉपर्टीतून होईल लाभ, रोमँटिक क्षणांचा मिळेल आनंद, वाचा साप्ताहिक राशी भविष्य - Weekly Horoscope

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 28, 2024, 12:10 AM IST

Weekly Horoscope
साप्ताहिक राशी भविष्य

Weekly Horoscope : कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावं, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशी भविष्य.

मेष : या आठवड्यात आपणास कुटुंबियांचं सहकार्य मिळेल. त्यांच्यासह वेळ घालवून आपण पैश्यांची बचत कशी करावी हे शिकून घ्याल. त्याचा आपणास भविष्यात मोठा फायदा होईल. वैवाहिक जीवनात तणाव जाणवेल. एखाद्या त्रयस्थाच्या हस्तक्षेपामुळं आपल्या नात्यात कटुता येऊ शकते. प्रणयी जीवन आनंदमय असेल. आर्थिक स्थिती उत्तम असेल. आर्थिक बचत करण्यात सुद्धा आपण यशस्वी व्हाल. आपण एखाद्या प्रॉपर्टीत गुंतवणूक करू शकता. व्यापाऱ्यांना एखादी चांगली बातमी मिळेल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील, परंतु काही मित्र त्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू शकतात. स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागेल. हा आठवडा प्रकृतीच्या बाबतीत काहीसा नाजूक आहे. आपणास आरोग्य विषयक काही त्रास संभवतो. कुटुंबियांसह आपण एखाद्या पार्टीत सहभागी व्हाल. तेथे अनेक जणांची भेट होईल.

वृषभ : विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचं दिसून येईल. कुटुंबियांकडून आपणास धनलाभ होईल. प्रणयी जीवनातील कटुता दूर करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागेल. मात्र, वाढीव खर्च करण्याची आपली तयारी असेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होईल. भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांना चांगला लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा मेहनत करण्याचा आहे. आपले वरिष्ठ आपल्यावर खुश झाल्याचं दिसून येईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. एखाद्या मंत्राच्या मदतीनं सुद्धा आपण प्रगती करू शकाल. या आठवड्यात आपली प्रकृती किरकोळच असेल. घरात पूजा-पाठाचं आयोजन होईल. बहिणीच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतील. जुने मित्र भेटतील. आपण मनःशांतीसाठी एखाद्या धार्मिक कार्यक्रमात थोडा वेळ व्यतीत कराल.

मिथुन : प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेच्या सहवासात खुश असल्याचं दिसून येईल. तिच्यासह बाहेर फिरावयास जाण्याचा बेत सुद्धा आखतील. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात सुखद क्षणांचा उपभोग घेतील. जोडीदाराच्या प्रगतीनं ते खुश झाल्याचं दिसून येईल. या आठवड्यात खर्च वाढले तरी प्राप्ती सुद्धा वाढेल. आपण जर पूर्वी कोठे गुंतवणूक केली असेल तर त्याचा सुद्धा लाभ होईल. व्यापारात एखाद्या अनुभवी व्यक्तीचा पाठिंबा आपणास मिळेल. कामाच्या ठिकाणी कार्यभार वाढला तरी आपण आपली कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांचं मन विचलित झाल्यानं अभ्यासाकडं त्यांचं लक्ष लागणार नाही. स्पर्धेसाठी आठवडा विशेष अनुकूल नाही. ऋतुमानातील बदलामुळं आपल्या प्रकृतीत चढ-उतार होतील. जे घरापासून दूर राहून नोकरी करत आहेत ते घराच्या आठवणीनं बेजार होतील. मित्रांच्या मदतीनं आपणास प्राप्तीचं नवीन स्रोत मिळतील.

कर्क : आर्थिक स्थिती चांगली असण्याची संभावना आहे. खर्चात कपात होईल. आपणास जर एखादी आर्थिक गुंतवणूक करावयाची असेल तर ती खूपच विचारपूर्वक करावी. व्यापाऱ्यांना थोडी गुंतवणूक करावी लागू शकते. नोकरी करणाऱ्यांचं स्थान परिवर्तन संभवते. विद्यार्थी मन लावून अध्ययन करत असल्याचं दिसून येईल. स्पर्धेत यश प्राप्तीची संभावना आहे. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास आपले आवडते विषय शिकण्याची संधी मिळेल. आपली प्रकृती ठीक राहील. कुटुंबियांचं सहकार्य मिळेल. वडिलधाऱ्यांकडून आपल्यावर एखादी जवाबदारी सोपविण्यात येईल, जी आपण सहजपणे पूर्ण करू शकाल. भावाच्या विवाहात येणारे अडथळे पूजा-पाठ केल्यानं दूर होतील. घरात मंगल कार्याचं आयोजन होईल. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. मातेचा सहवास आणि सहकार्य लाभेल.

सिंह : या आठवड्यात आपण आपल्या प्रेमिकेसह बाहेर फिरावयास जाण्याचा बेत ठरवाल. एकमेकांप्रती विश्वास वाढेल. वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदेल. आपणास जोडीदार एखादे नवीन कार्य सुरु करून देऊ शकेल. आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम फलदायी आहे. आपली प्राप्ती ठीक राहील. आपण एखाद्या प्रॉपर्टीसाठी पैसा खर्च कराल. शासकीय नोकरी करत असलेल्यांची पदोन्नती संभवते. विद्यार्थी अभ्यासाकडं लक्ष लावण्याचा प्रयत्न करतील. त्यांना गुरुजनांची मदत मिळेल. या आठवड्यात आपली प्रकृती नाजूकच राहील. जे घरून काम करतात त्यांना खूप मोठा लाभ होईल. व्यापारी त्यांच्या व्यवसायास पुढे नेण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांना नोकरीच्या ठिकाणी देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. आपण मातेसह एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. तेथे थोडा वेळ घालवल्यानं आपणास मनःशांती लाभेल.

कन्या : या आठवड्यात आपण कुटुंबियांसह एखाद्या धार्मिक ठिकाणी फिरावयास जाण्याचं आयोजन कराल. प्रणयी जीवनात चढ-उतार होत असल्याचं दिसून येईल. वैवाहिक जीवनात सर्वकाही आलबेल असेल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा खर्चिक आहे. आपण एखादी गुंतवणूक करण्याचं आयोजन सुद्धा कराल, ज्यात आपण यशस्वी व्हाल. अचानकपणे एखादा खर्च उभा झाल्यानं आपणास त्रास होऊ शकतो. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कामात खूपच व्यस्त राहतील. कार्यालयीन कामासाठी एखादा प्रवास सुद्धा करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचं वेळापत्रक बनविल्यास ते त्यांच्या हिताचं होईल. पूर्वीपेक्षा आपली प्रकृती उत्तम राहील. आपल्यावर वडिलधाऱ्यांचा वरदहस्त राहील. एखाद्या मित्राच्या मदतीनं आपणास प्राप्तीची नवीन स्रोत उपलब्ध होतील. मुलांचं सहकार्य मिळेल.

तूळ : विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात अत्यंत खुश असल्याचं दिसून येईल. ते आपल्या जोडीदारासह बाहेर फिरावयास जाण्याचं आयोजन सुद्धा करतील. मुलांचं सहकार्य मिळेल. आपली आर्थिक स्थिती मजबूत राहील. रोजच्या प्राप्तीत वृद्धी होईल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. व्यापारात सुद्धा चांगला लाभ संभवतो. व्यापारा निमित्त प्रवास करावं लागू शकतात. हे प्रवास आपल्यासाठी सुखावह होईल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून चांगली बातमी मिळेल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास आपल्या आवडीचे विषय शिकण्याची संधी मिळेल. ऋतू बदलामुळं आपल्या प्रकृतीत चढ-उतार होत असल्याचं दिसून येईल. पैतृक संपत्तीतून धनलाभ संभवतो. नवीन वाहनाचे सौख्य लाभेल. घर, प्लॉट इत्यादी खरेदी करण्याची आपण जी योजना आखत होता त्यात यशस्वी व्हाल. भावंडांचे सहकार्य मिळेल.

वृश्चिक : या आठवड्यात आपला वैवाहिक जोडीदार आपल्यासाठी एखादे नवीन कार्य सुरु करून देऊ शकेल. आपले वडील आपल्या व्यवसायात आर्थिक गुंतवणूक करतील. पैतृक व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या व्यवसायात थोडा बदल करतील. कुटुंबियांचं सहकार्य मिळेल. माता-पित्याचं सानिध्य आणि सहकार्य लाभेल. एखाद्या दूरस्थ नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळेल. सर्वजण मिळून एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याचे आयोजन कराल. नोकरी करणाऱ्यांना प्रगतीची संधी मिळेल. ज्या व्यक्ती समाज कल्याणासाठी कार्य करत आहेत त्यांच्या मान-सन्मानात वाढ होईल. व्यापारी त्यांच्या व्यापारा निमित्त प्रवास सुद्धा करतील, जे त्यांच्यासाठी लाभदायी ठरतील. स्पर्धेची तयारी करत असणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. आपली प्रकृती उत्तम राहील. घरात पूजा-पाठाचं आयोजन होईल. एखाद्या नवीन पाहुण्याच्या आगमनानं घरात आनंदाचं वातावरण राहील. आपली एखादी मनीषा पूर्ण होईल.

धनु : आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला आहे. आपल्या खर्चात कपात होऊन प्राप्तीत वृद्धी होईल. व्यापाऱ्यांना थोडी आर्थिक गुंतवणूक सुद्धा करावी लागेल. मित्रांच्या मदतीनं नवीन कंत्राट सुद्धा मिळतील. कामाच्या ठिकाणी कार्यभार वाढेल. आपला आत्मविश्वास उंचावलेला असेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचं संकेत आहेत. उच्च शिक्षणासाठी आठवडा ठीक आहे. आपली प्रकृती ठीक राहील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात चढ-उतार होत असल्याचं दिसून येईल. प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेस आपल्या मनातील विचार सांगू शकतात. तिला एखादी भेटवस्तू सुद्धा देऊ शकतात. माता-पिता मुलांच्या भवितव्यासाठी आर्थिक गुंतवणूक करतील. आपणास जर एखादी जमीन खरेदी करावयाची असेल तर ती या आठवड्यात आपण खरेदी करू शकता. आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमातून स्वतःसाठी थोडा वेळ काढून आपल्या आवडीची कामे कराल.

मकर : हा आठवडा विवाहितांसाठी अत्यंत चांगला आहे. जोडीदाराच्या प्रगतीनं आपण खुश झाल्याचं दिसून येईल. कुटुंबीय एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचं आयोजन सुद्धा करतील. मुलांच्या भवितव्यासाठी आपण थोडी आर्थिक गुंतवणूक सुद्धा कराल. जुने मित्र भेटतील. मित्रांमुळं आपणास प्राप्तीचे नवीन स्रोत मिळतील. या आठवड्यात आपण कुटुंबियांसाठी थोडी खरेदी कराल. आपलं प्रणयी जीवन सुखद होईल. आपली आर्थिक स्थिती मजबूत राहील. नवीन कंत्राट मिळतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा लाभ होईल. विद्यार्थ्यांची अभ्यासातील कामगिरी उत्तम होईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास आपल्याआवडीचे विषय शिकण्याची संधी मिळेल. या आठवड्यात प्रकृतीत विशेष सुधारणा होईल असं दिसत नाही. घरात पूजा - पाठाचं आयोजन होईल. आजूबाजूला होत असलेल्या वाद - विवादापासून दूर राहावं.

कुंभ : या आठवड्यात विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचं दिसून येईल. कुटुंबियांचं सहकार्य मिळेल. प्रेमीजनांनी अहंकारीत होऊन प्रेमिकेशी बोलल्यास त्यांच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. आपली आर्थिक स्थिती चांगली राहील. नवीन वाहनाचं सौख्य लाभेल. आपण एखादी प्रॉपर्टी सुद्धा खरेदी करू शकता. नोकरी करणाऱ्यांची त्यांच्या कुवतीनुसार पदोन्नती संभवते. व्यापाऱ्यांना एखादी सरकारी ऑर्डर मिळू शकते. विद्यार्थी मन लावून अभ्यास करत असल्याचं दिसून येईल. स्पर्धेसाठी तयारी करत असणाऱ्यांना त्यांची मेहनत वाढवावी लागेल. बदलत्या ऋतुमानामुळं प्रकृतीत चढ-उतार होताना दिसून येईल. भावंडांच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतील. थकबाकी सुद्धा मिळेल. जोडीदाराच्या प्रकृतीत सुधारणा होईल.

मीन : या आठवड्यात प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेस मनातील विचार सांगून विवाहाची मागणी सुद्धा घालू शकतील. विवाहेच्छुकांच्या विवाहाची बोलणी संभवतात. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचं दिसून येईल. या आठवड्यात काही खर्च आपणास त्रस्त करू शकतात. आपणास आपल्या बचतीची रक्कम मोडावी लागेल. प्रत्येक खर्च सावधपणे करावेत. व्यापाऱ्यांना नवीन काम मिळेल. त्यांना व्यापारानिमित्त प्रवास करण्याची संधी सुद्धा मिळेल. हे प्रवास त्यांच्यासाठी लाभदायी ठरतील. नोकरी करणाऱ्यांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. विद्यार्थी अभ्यासात एकाग्रचित्त होण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येईल. आपली प्रकृती ठीक राहील. थकबाकी मिळेल. घर, प्लॉट खरेदी करण्याचं आपण जे आयोजन करत होता त्यात यशस्वी व्हाल. एखाद्या नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळेल.

हेही वाचा -

  1. देशभरात आज साजरी होतेय हनुमान जयंती,समर्थ रामदासांनी स्थापित केलेले अकरा मारुती कुठे आहेत? - Hanuman Jayanti 2024
  2. हनुमान जयंती 2024 : देशातील एकमेव गरुड हनुमंताची मूर्ती आहे नाशिकमध्ये, मूर्तीला अर्पण करतात कोकम सरबत, कैरी पन्ह अन् आंब्याचा रस - Hanuman Jayanti 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.