ETV Bharat / politics

मराठा आरक्षणाच्या घोषणेनंतर राज ठाकरेंचा सरकारला टोला, वाचा जरांगे पाटलांना उद्देशून काय म्हणाले

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 27, 2024, 5:01 PM IST

Updated : Jan 27, 2024, 5:13 PM IST

Raj Thackeray Maratha Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाची घोषणा केल्यानंतर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला टोला हाणला आहे. काय म्हणाले राज ठाकरे, जाणून घेण्यासाठी वाचा पूर्ण बातमी.

Raj Thackeray
Raj Thackeray

मुंबई Raj Thackeray Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत सरकारनं मराठा आरक्षणाची घोषणा केली. सरकारनं त्या संदर्भातील अधिसूचनाही काढली आहे. आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांना ओबीसींचे लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यासह मराठ्यांना ओबीसींच्या सर्व सवलतीही दिल्या जाणार आहेत. यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक मराठा नेत्यांनी सरकारच्या या घोषणेचं स्वागत केलं, तर छगन भुजबळ यांच्यासारख्या ओबीसी नेत्यांनी याचा विरोध केला आहे.

काय म्हणाले राज ठाकरे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेंनी 'X' वर पोस्ट करत मनोज जरांगेंचं अभिनंदन केलं. मात्र आपल्या पोस्टमध्ये त्यांनी सरकारला टोला मारला आहे. राज ठाकरे मनोज जरांगे पाटलांना उद्देशून म्हणाले, "सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे आपल्या मराठा बांधवांना, भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल. लोकसभा निवडणुकीआधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा."

  • श्री. मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल ! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही…

    — Raj Thackeray (@RajThackeray) January 27, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

छगन भुजबळांचा विरोध : राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं शुक्रवारी रात्री मनोज जरांगेंची भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे तीन तास चर्चा झाली. यावेळी सरकारनं मनोज जरांगेंना सुधारित अधिसूचना सुपूर्द केली. या अधिसूचनेत सग्या-सोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मात्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. त्यांनी जरांगे पाटलांवर झुंडशाहीनं नियम, कायदे बदलल्याचा आरोप केला. तसेच 16 फेब्रुवारीपर्यंत अधिसूचनेवर लाखोंच्या संख्येनं हरकती पाठवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

हे वाचलंत का :

  1. मराठा आरक्षणाबाबतच्या अधिसूचनेविरोधात न्यायालयात जाणार; गुणरत्न सदावर्तेंची भूमिका
  2. जरांगेंच्या मागण्यांवर सरकारनं काढली अधिसूचना, काय आहे अधिसूचनेत; मध्यरात्री काय घडलं?
  3. मराठ्यांचा ऐतिहासिक विजय! आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत सर्वांना ओबीसींच्या सुविधा मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
Last Updated : Jan 27, 2024, 5:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.