ETV Bharat / politics

महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज - Lok Sabha Elections

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 2, 2024, 4:57 PM IST

Updated : Apr 2, 2024, 5:10 PM IST

Lok Sabha Elections : शिवसेना शिंदे गटाचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी आज लोकसभेच्या निवडणुकीचा नामांकन अर्ज दाखल केला. याप्रसंगी त्यांच्याबरोबर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) उपस्थित होते.

Prataprao Jadhav
प्रतापराव जाधव

प्रतिक्रिया देताना खा. प्रतापराव जाधव

बुलढाणा Lok Sabha Elections : बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या (Buldhana Lok Sabha Constituency) जागेवरून महायुतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. महायुतीकडून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिली असतानाही, भाजपाकडून माजी आमदार विजयराज शिंदे (Vijayraj Shinde) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

चौथ्यांदा उमेदवारी जाहीर : शिंदे गटाचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांना चौथ्यांदा शिवसेना पक्षानं उमेदवारी जाहीर केल्यानंतर आज खासदार प्रतापराव जाधव यांनी महायुतीच्या नेत्यांसमवेत आपला उमेदवारी अर्ज बुलढाणा लोकसभेसाठी (Buldhana Lok Sabha) दाखल केला. त्यांच्या समवेत मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne), आमदार डॉ. संजय रायमुलकर (Sanjay Raimulkar), आमदार डॉ. संजय कुटे, आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad), आमदार आकाश फुंडकर (Akash Fundkar) आणि आमदार श्वेता महाले या उपस्थित होत्या.

विजयराज शिंदे यांनी अर्ज भरला ते मला उशिरा माहीत झालं. आज अर्ज भरण्याची गडबड असल्यानं त्यांनी अर्ज भरला असेल तर निश्चितच वरिष्ठ पातळीवर महायुतीचे नेते त्यांच्याशी चर्चा करतील. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला सुटलेला आहे आणि शिवसेनेचा अधिकृत AB फॉर्म मी आज जोडलेला आहे. - प्रतापराव जाधव, महायुतीचे उमेदवार




भाजपा नेत्याला लवकरच त्याची लायकी कळेल : लोकसभेचा अर्ज भरल्यानंतर शिंदे गटाच्या मंत्र्यांची जीभ घसरली. बुलढाणा जिल्हा लोकसभेसाठी महायुतीनं आपला उमेदवार दिला असताना भाजपाकडून विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विजयराज शिंदे यांना लवकरच आपली लायकी कळेल, अशा भाषेत शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सडकून टीका केली आहे. त्यामुळं प्रचाराची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच बुलढाणा जिल्ह्यात महायुतीत रणसंग्राम पेटला असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा -

  1. नाराजी वाढत असताना एकनाथ शिंदेंचाही पत्ता कट झालेला दिसेल-संजय राऊत यांचा दावा - Sanjay Raut News
  2. प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात काँग्रेसचे डॉ. अभय पाटील लढणार, राज्यात वंचितचा कुणाला बसणार फटका ? - lok sabha election 2024
  3. ठाणे लोकसभा कोण लढवणार? जाणून घ्या नेमकं काय म्हणाले प्रताप सरनाईक - Thane Lok Sabha constituency
Last Updated :Apr 2, 2024, 5:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.