ETV Bharat / politics

लोकसभेची उमेदवारी मिळताच नवनीत राणांनी पतीच्या पक्षाचा दिला राजीनामा, शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये केला पक्षप्रवेश - NAVNEET RANA Joins BJP

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 28, 2024, 7:06 AM IST

Updated : Mar 28, 2024, 7:40 AM IST

लोकसभेच्या निवडणुकीत नेत्यांचे पक्षप्रवेश आणि पक्षांतर सातत्यानं होत आहेत. खासदार नवनीत राणांचा भाजपामधील पक्षप्रवेश हा चर्चेचा ठरत आहेत. त्यांना भाजपाकडून प्रथम उमेदवारी झाली. त्यानंतर त्यांनी भाजपाचं कमळ हाती घेतले. विशेष म्हणजे भाजपामध्ये पक्षप्रवेश करण्यापूर्वी त्यांनी पती रवी राणा अध्यक्ष असलेल्या पक्षाचा राजीनामा दिला.

Navneet Rana joins BJP
Navneet Rana joins BJP

नागपूर- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी उशिरा अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी शेकडो नवनीत राणा समर्थकांनाही भाजापमध्ये पक्ष प्रवेश केला. यावेळी आमदार रवी राणादेखील उपस्थित राहिले. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूरच्या कोराडी येथील निवासस्थानी असलेल्या जनसंपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला.

सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार- "मी मागील अनेक वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारानुसार काम करीत आहे. अमरावती मतदारसंघातून मला उमेदवारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, राज्याचे नेते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार व्यक्त करते. भारतीय जनता पक्षात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. विरोधी पक्षात असताना ३३ महिने लढा दिला. आमची विचारधारा एक असल्यानं आम्ही वेगळे होऊ शकत नाही. भाजपाच्या ४०० पार च्या संकल्पात अमरावतीची खासदार म्हणून मी एक असेल," असेही त्या म्हणाल्या.



नवनीत राणा महाराष्ट्राच्या नेत्या असतील- "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश घेतला आहे. त्यांचा पक्षप्रवेश भाजपा संघटनेला मजबुती देणारा असेल. नवनीत राणा या अमरावती नव्हे तर विदर्भ व महाराष्ट्राच्या नेत्या असतील," असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.


पक्षातील नेत्यांचा विरोध झुगारून राणांना उमेदवारी- अमरावतीची लोकसभा निवडणुक भाजपाच्या उमेदवारीवर लढण्यासाठी नवनीत राणा फारचं इच्छुक होत्या. मात्र,स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह बच्चू कडू यांनी नवनीत राणांच्या लोकसभा उमेदवारीला तीव्र विरोध दर्शविला. त्यामुळे त्यांचा भाजपा पक्ष प्रवेश रखडलेला होता. याशिवाय जात प्रमाणपत्राचा निकाल प्रलंबित असल्यानं त्यांना भाजपानं वेटिंगवर ठेवलं होतं.

तिकीट जाहीर होताच भाजपामध्ये पक्षप्रवेश- भारतीय जनता पक्षाने बुधवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर नवनीत राणा यांना भाजपमध्ये पक्ष प्रवेश करण्यासाठी खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेनी निमंत्रण पाठविलं. नवनीत राणा शेकडो समर्थकांसह नागपुरात दाखल झाल्यानंतर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

पतीच्या पक्षाचा दिला राजीनामा- खासदार नवनीत राणा यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेण्यापूर्वी राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष हे नवनीत राणांचे पती आमदार रवी राणा आहेत. रवी राणा यांच्याशी विवाह झाल्यानंतर अभिनेत्री नवनीत कौर यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. राष्ट्रवादीकडून त्यांनी प्रथम २०१४ मध्ये निवडणूक लढविली. मात्र, त्यांना पराजय स्वीकारावा लागला. २०१९ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढविल्यानंतर त्यांना लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला.

हेही वाचा-

  1. अमरावतीत नवनीत राणा यांच्या हाती कमळ: भाजपाने अधिकृत उमेदवार म्हणून केले जाहीर - Navneet Rana BJP Candidate
  2. MP Navneet Rana : नवनीत राणा भाजपामध्ये जाण्यासाठी सज्ज; अपक्ष लढण्याचीही तयारी
  3. निवडणुकीचं टेन्शन विसरून होळीसाठी नवनीत राणा थेट मेळघाटात - Navneet Rana
Last Updated :Mar 28, 2024, 7:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.