ETV Bharat / politics

हुशशश! अखेर नाशिकमधील महायुतीचा तिढा सुटला; आज जाहीर होणार उमेदवार, गिरीश महाजनांची माहिती - Lok Sabha Election

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 1, 2024, 8:20 AM IST

Lok Sabha Election
हुशशश! अखेर नाशिकमधील महायुतीचा तिढा सुटला; आज जाहीर होणार उमेदवार, गिरीश महाजनांची माहिती

Lok Sabha Election 2024 : बहुचर्चित नाशिक लोकसभेचा तिढा अखेर सुटला असून आज महायुतीचा उमेदवार जाहीर होणार असून 2 मे रोजी नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील उमेदवार अर्ज भरणार असल्याची माहिती भाजपा नेते गिरीश महाजन यांनी दिलीय.

भाजपा नेते गिरीश महाजन

नाशिक Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीचा तिढा सुटला असून उमेदवारीबाबतचा निर्णय तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते मिळून घेणार आहेत. आज उमेदवार कोण असेल, या बाबत निर्णय जाहीर केला जाईल. तसंच 2 मे रोजी रेकॉर्डब्रेक गर्दीसह नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील उमेदवार अर्ज भरणार आहेत. त्या दृष्टीनं तिन्ही पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची जय्यत तयारी असल्याचं भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी सांगितलंय. मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी साधलेल्या संवादात ही माहिती दिली.


विजय आमचाच महाजनांचा विश्वास : नाशिकची उमेदवारी जाहीर करण्यात काहीसा विलंब झाला असला, तरी त्यामुळं निकालात फारसा फरक पडणार नाही. नाशिकसह दिंडोरीची जागा गत निवडणुकीप्रमाणेच मोठ्या मताधिक्यानं जिंकून या दोन्ही उमेदवारांना दिल्लीत पाठवलं जाणार असल्याचा विश्वासही गिरीश महाजनांनी व्यक्त केला. नाशिकमधील उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला आणि कोणतंही नाव असलं तरी त्या उमेदवारासाठी किमान 25 हजार हुन अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते मैदानात उतरणार असून विजय आमचाच होईल, असंही महाजन यांनी म्हटलंय. नाशिकच्या जागेबाबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं.


महाजन यांच्या गुप्त बैठका : गिरीश महाजनांनी महायुतीच्या काही पदाधिकाऱ्यांसोबत एका हॉटेलमध्ये गुप्त बैठका घेतल्याची माहिती समोर येत आहे. नाशिकचा महायुतीचा उमेदवार ठरत नसताना महाजनांचा नाशिक दौरा चर्चेचा विषय बनलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पिंपळगाव इथं होणाऱ्या सभेचं नियोजनही सुरु असल्याची माहिती मिळतेय.

भाजपा नेते भुजबळांच्या भेटीला : नाशिक जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी भुजबळ फार्मवर छगन भुजबळांच्या भेटीला पोहोचले होते. दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार, नाशिक शहराध्यक्ष प्रशांत जाधव, माजी आमदार बाळासाहेब सानप आणि इतर पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. तसंच मंत्री गिरीश महाजन यांनी देखील भुजबळ यांची भेट घेतली. भुजबळांच्या दालनात भाजपा नेते, पदाधिकाऱ्यांसोबत छगन भुजबळांची चर्चा झाली.

हेही वाचा :

  1. "...हे शरद पवारांनी कोल्हापुरात येऊन म्हणावं", संजय मंडलिकांचं ओपन चॅलेंज - Lok Sabha Election 2024
  2. “मी नागपुरी, मला...”, देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला - Devendra Fadnavis
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.