ETV Bharat / politics

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या फलकावर शाईफेक, सुप्रिया सुळे यांनी केली 'ही' मागणी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2024, 3:57 PM IST

Ink Thrown On Sunetra Pawar Banner : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या फलकावर शाईफेक झाल्याचा प्रकार बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे घडला आहे. यावर राजकीय वातावरण तापलं असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

Ink Thrown On Sunetra Pawar Banner
सुनेत्रा पवार यांच्या फलकावर शाईफेक

बारामती Ink Thrown On Sunetra Pawar Banner : बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे उभारण्यात आलेल्या फ्लेक्स फलकावर अज्ञात व्यक्तीनं शाईफेक केल्याची घटना घडली आहे. त्यामुळं बारामतीमध्ये वातावरण तापलंय. अजित पवार यांच्या काऱ्हाटी येथील कार्यकर्त्यांनी आपल्या शेती फार्मवर सुनेत्रा पवार यांचा फ्लेक्स लावला होता. या फ्लेक्सवर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीनं शाईफेक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फलकावर शाई फेकल्याचं लक्षात येताच गावकऱ्यांनी संबंधित फलक उतरवला.


राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण : काऱ्हाटीतील एका शेती फार्म मालकानं सुनेत्रा पवार यांचा फलक उभा केला होता. या फलकावर रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन कोणीतरी शाई फेकल्याचं आज (11 फेब्रुवारी) सकाळी निदर्शनास आलं. बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या पक्षातून सुनेत्रा पवार या लोकसभेच्या खासदारकीच्या उमेदवार असणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सध्या फलक उभारले जात आहे. त्यापैकी एका फ्लेक्सवर काऱ्हाटी गावात शाईफेक करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.



फलकावर अजित पवारांचाही फोटो : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळालं आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेला आपला उमेदवार उभा करणार असल्याचं जाहीर केलं. अजित पवार यांनी अद्याप उमेदवाराचं नाव जाहीर केलं नसलं तरी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच लोकसभेसाठी उमेदवार असणार असल्याच्या चर्चा आहेत. याच पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेसाठी प्रचंड मतांनी विजयी करा, या आशयाचा फलक त्यांच्या समर्थकांकडून लावण्यात आला होता. मात्र, या फलकावर अज्ञातांनी शाईफेक केल्याचा प्रकार घडला आहे. शाईफेक करण्यात आलेल्या फलकावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचादेखील फोटो आहे.


  • सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया : सदरील घटनेसंदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं असता त्या म्हणाल्या की, "सदर प्रकार चुकीचा आहे. हे कृत्य ज्यानी कोणी केलं असेल त्याची चौकशी झाली पाहिजे", अशी प्रतिक्रिया खासदार सुळे यांनी दिली.


हेही वाचा -

  1. महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीवर अजित पवार कडाडले, दिला 'हा' स्पष्ट इशारा
  2. बाबा सिद्दीकी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
  3. शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक; अजित पवारांच्या नावाची पाटी फोडली
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.