ETV Bharat / politics

माढा लोकसभा मतदारसंघातून मविआ कोणाला मैदानात उतरवणार? दिवंगत गणपत देशमुखांच्या शिष्याचं नाव चर्चेत - Lok Sabha Elections

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 25, 2024, 11:03 PM IST

Lok Sabha Elections : महायुतीनं लोकसभेची एक जागा महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना देण्याची घोषणा केली आहे. जानकर महायुतीकडून निवडणूक लढवणार असल्यामुळं आता मविआकडून माढा जागेसाठी अन्य उमेदवाराचा शोध चालू आहे. मिळालेल्या माहितीनुसार या जागेसाठी महाविकास आघाडीकडून प्राध्यापक रघुनाथ पाटील (Raghunath Patil) यांचा विचार केला जातोय.

Lok Sabha Elections Mahavikas Aghadi may give ticket to Raghunath Patil for Madha Constituency
माढा लोकसभा मतदारसंघातून मविआ कोणाला मैदानात उतरवणार? दिवंगत गणपत देशमुखांच्या शिष्याचं नाव चर्चेत

प्राध्यापक रघुनाथ पाटील

ठाणे Lok Sabha Elections : सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र्रातील शेकापचे दिवंगत जेष्ठ नेते गणपतराव देशमुखांचे शिष्य माढा लोकसभेच्या मैदानात तुतारीकडून लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. इतके दिवस महादेव जानकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असं खुद्द जानकर यांनीच सांगितल्यानंतर 24 मार्चला ते महायुतीकडून लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यानंतर आता माढा लोकसभा मतदार संघातून प्राध्यापक रघुनाथ पाटील यांचं नाव चर्चेला आलं आहे.


रघुनाथ पाटील यांच्या नावाची चर्चा : शरदचंद्र पवार या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभेची जागा धनगर समाजाला देण्याचे यापूर्वीच जाहीर केलं आहे. त्यामुळं यशवंत सेनेचे प्रदेश संघटक प्रा. रघुनाथ पाटील यांच्या नावाची चर्चा केली जात आहे. प्रा. रघुनाथ पाटील हे सांगोल्याचे माजी आमदार स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांचे शिष्य आणि शरद पवार यांचे खंदे आणि कट्टर कार्यकर्ते आहेत. पाटील यांनी धनगर समाजात गेली वीस वर्षे कुशल संघटक म्हणून काम केलंय. हलाख्याची परिस्थितीत प्रा. रघुनाथ पाटील यांचं शिक्षण झाल्यानं त्यांना तळागाळातील समाजाच्या परिस्थितीची जाणीव आहे.


शरद पवारांशी चर्चा : शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी प्रा. रघुनाथ पाटील यांची चर्चा चालू असल्याचं म्हटलं जातंय. तसंच रघुनाथ पाटील हे मतदारसंघातील महत्त्वाच्या लोकांच्या भेटी घेत आहेत. तर त्यांच्या उमेदवारीला सर्वसामान्यातून पसंती मिळत असल्याचं खुद्द प्रा. रघुनाथ पाटील यांनी सांगितलंय. याच सर्व घडामोडींमुळं रघुनाथ पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळं या जागेवर शरद पवार नेमकी कोणाला संधी देणार?, याची उत्सूकता सर्वांनाच लागली आहे.

हेही वाचा -

  1. महादेव जानकरांचा 'रासप' महायुतीत सामील; जानकरांना कुठली एक जागा मिळणार? - Mahadev Jankar
  2. 'रासप'ला महायुतीच्या बैठकीत निमंत्रण नाही; महादेव जानकर वेगळ्या विचारात?
  3. युतीसाठी अजून कोणाचं आमंत्रण नाही, रासप लोकसभा स्वबळावर लढवण्याच्या तयारीत - महादेव जानकर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.